कोरोना उपचार, तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा सज्ज, नवी मुंबईकरांना शहराबाहेर जावं लागणार नाही : एकनाथ शिंदे

नवी मुंबई महापालिकेतर्फे 960 LPM क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कोव्हिड सेंटरमधील HRCT डायग्नोस्टिक स्कॅनिंग मशीनचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

कोरोना उपचार, तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा सज्ज, नवी मुंबईकरांना शहराबाहेर जावं लागणार नाही : एकनाथ शिंदे
Eknath Shinde
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:12 PM

नवी मुंबई : महापालिकेतर्फे 960 एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि याचबरोबर सिडको एक्झिबिशन केंद्रातील कोव्हिड सेंटरमधील HRCT डायग्नोस्टिक स्कॅनिंग मशीनचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा शुभारंभांचा कार्यक्रम पार पडला. वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय तर सिडको एक्झिबिशन केंद्रात ही सुविधा सुरु झाल्याने नवी मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील नागरिकांना कोरोना संबंधित कोणत्याच तपासणीला अथवा उपचारासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Corona treatment, Modern testing lab is ready, Navi Mumbaikar will not have to go out of the city : Eknath Shinde)

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 1 हजार लीटर परमिनिट निर्मिती असलेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. शिवाय 200 बेड्सना यामार्फत ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. तर कोव्हिड केंद्रात अत्याधुनिक परदेशी स्कॅनिंग मशीन बसवली गेल्याने केंद्रातील रुग्णांना बाहेर न जाता येथेच ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय कोव्हिडच्या पुढील स्टेजचे त्वरित निदान होऊन त्यावर उपचार लवकरात लवकर करता येतील.

प्रतिदिन 100 लोकांची मोफत तपासणी याद्वारे केली जाणार आहे. तर ही सुविधा नि:शुल्क असल्याने एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचे तसेच सीएसआर निधी देण्याऱ्यांचे कौतुक केले. तर या दोन्ही सुविधा शहरातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी दिलासा देणाऱ्या असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

इतर बातम्या

नवी मुंबईतील नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रेंवर गुन्हा, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मारहाणीचा आरोप

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, फरार टँकर चालकाला पोलिसांच्या काही वेळातच बेड्या

(Corona treatment, Modern testing lab is ready, Navi Mumbaikar will not have to go out of the city : Eknath Shinde)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.