200 हून अधिक शर्यती जिंकलेल्या लाडक्या बैलाचा मृत्यू, कुटुंबीयांकडून दशक्रिया विधी
वाजे येथील शंकर बाळाराम भगत यांच्या लाडक्या बैलाचा 31 जुलै रोजी मृत्यू झाला. शंकर बाळाराम भगत या शेतकऱ्याने त्यांच्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याची दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य पूर्ण केले. बैलाच्या मृत्युने घरातील एखादा कर्ता व्यक्ती दगावल्याचे दुःख भगत कुटुंबीयांना झालं. बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगत कुटुंबीयांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
नवी मुंबई : वाजे येथील शंकर बाळाराम भगत यांच्या लाडक्या बैलाचा 31 जुलै रोजी मृत्यू झाला. शंकर बाळाराम भगत या शेतकऱ्याने त्यांच्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याची दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य पूर्ण केले. बैलाच्या मृत्युने घरातील एखादा कर्ता व्यक्ती दगावल्याचे दुःख भगत कुटुंबीयांना झालं. बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगत कुटुंबीयांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
माणसाचा निधन झालं की त्याचा दहावा विधी आणि उत्तर कार्य केले जातात. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील वाजे गावात एका शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या बंड्या बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केली आणि त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
25 वर्ष दिली शेतकऱ्याची साथ
शेतकऱ्याचा जीवाभावाचा खरा मित्र म्हणजे शेतीत काबाडकष्ट करणारा बैल. पनवेल तालुक्यातील वाजे गावात अशाच एका मायाळू बैलाने वयाची तब्बल 25 वर्ष इमानेइतबारे प्रपंचाचा गाडा ओढत शेतकऱ्याला साथ दिली. 31 जुलै रोजी वृद्धापकाळामुळे या बण्ड्या नावाच्या बैलाचा दुर्देवी अंत झाला. शंकर बाळाराम भगत यांनी पोटच्या मुलाप्रमाणे बैलाचा सांभाळ केला. त्यांनी प्रेमाने त्याचे नाव बण्ड्या ठेवले. जसजसे दिवस सरत गेले तस तसा बंड्या कधी शेताच्या नांगरणीला तर कधी मालकाची पत राखण्याकरता बण्ड्या बैलगाडा शर्यतीत जीव तोडून धाऊ लागला.
बैलगाडा शर्यतीत अनेक विक्रम, 200 हून अधिक शर्यती जिंकल्या
बैलगाडा शर्यतीत अगदी कमी वेळात धावण्याचे बण्ड्याने अनेक विक्रम केले. त्यामुळे पंचक्रोशीत बण्ड्या प्रसिद्ध झाला. तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीत फायनल सम्राट म्हणून बण्ड्याने बादल्या, हंडे बोकड़ सारखी अनेक बक्षिसे मिळविली. जवळपास 200 हून अधिक शर्यती या बंड्या बैलाने जिंकला असल्याच्या भगत यांनी सांगितले.
शर्यतीत जिंकलेल्या बादल्या, हंडे आजही शंकर भगत यांच्या घरी आहेत. पाच वर्षांपूर्वी प्राणिमित्र संघटनेने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. त्यानंतर बैलांच्या रुबाबाला उतरती कळा लागली. वयाच्या 25 व्या वर्षी बंड्या बैलाच वृद्धापकाळाने निधन झाले. बैलाच्या कृतज्ञतेपोटी भगत यांनी बैलाच्या निधनानंतर त्यांच्या घराशेजारी त्याचा दफनविधी केला. त्यानंतर गाढेश्वर येथे दहावा विधी व उत्तर कार्य देखील केले. यावेळी त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिले होते. या कार्याला पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा https://t.co/YLGNYw97eB pic.twitter.com/Vzhc4iD1F7
— नवी मुंबई वार्ता (@DfHUleIPEtgyVk2) August 10, 2021
संबंधित बातम्या :
मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण