Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली

नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंगी, मलेरियाचे संशयित रुग्‍ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्‍णसंख्या वाढत असल्‍याने नवी मुंबई महापालिकेने घरोघरी शोधमोहीम सुरु केली आहे.

नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली
dengue
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:33 AM

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंगी, मलेरियाचे संशयित रुग्‍ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्‍णसंख्या वाढत असल्‍याने नवी मुंबई महापालिकेने घरोघरी शोधमोहीम सुरु केली आहे.

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे या भागातील सर्व खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी होत आहे; परंतु तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे डेंग्यूचे जानेवारीपासून आठ रुग्ण सापडल्याची नोंद आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून समोर येणाऱ्या अहवालांवर पालिकेतर्फे नजर ठेवली जाणार आहे.

एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या बदलते हवामान, मोकळ्या भूखंडावर गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झोपडपट्टी बहुल आणि गावठाणातील चाळींमध्येही डेंगीची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना

नवी मुंबईत सध्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील डेंग्युच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेत डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, डेंग्युचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी समनव्य राखून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

जेथे रुग्णसंख्या अधिक असेल तेथे डास उत्पत्ती शोध मोहिम राबविणार

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ज्याप्रमाणे हॉटस्पॉट निश्चित करुन लक्ष केंद्रीत केले जाते, त्याचप्रमाणे डेंग्युचा संशयित रुग्ण आढळल्यास त्या भागाकडे लक्ष केंद्रीत करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करावी. ज्या भागात जास्त केसेस त्याठिकाणी डास उत्पत्ती शोध मोहिम तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. डेंग्युचा प्रसार रोखण्यासाठी मादी आढळल्यानंतर संबंधित घरासह त्या परिसरातील 100 घरांचे सर्वेक्षण करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते, ती अधिक प्रभावीपणे राबविण्यास तत्परतेने सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बारवर कारवाई, दीड लाखांचा दंड वसूल

विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ, उद्या 100 केंद्रावर 37 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन