Devendra Fadnavis : त्यांना झोपू द्यायचं नाही असा पण केला, आणि…; भाजपा कार्यकारिणीत फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कथा

राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. ते पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? अशा भ्रष्ट सरकारला एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचे आभार, त्यांनी या संघर्षात साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : त्यांना झोपू द्यायचं नाही असा पण केला, आणि...; भाजपा कार्यकारिणीत फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कथा
भाजपा कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 5:31 PM

नवी मुंबई : सरकार बदला घेतं होतं आणि भ्रष्टाचार करत होतं. त्यांना एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. नवी मुंबईत आयोजित भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे सहकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, की हे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा होती, त्यांना परिवर्तन हवं होतं, ती इच्छा पूर्ण केली आहे. एक प्रकारे मोकळा श्वास आपण घेतो आहोत. गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. ते पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? अशा भ्रष्ट सरकारला एक दिवस झोपू द्यायचं नाही असा पण केला. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचे आभार, त्यांनी या संघर्षात साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.

‘महाराष्ट्रात आश्चर्य घडलं’

विकासाची गती कमी झाली, प्रगतीचे सर्व कार्यक्रम ठप्प, स्थगिती. जे चांगलं आहे ते करायचंच नाहीये, अशी भूमिका केंद्राने कोट्यवधी रुपये देऊन सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचं काम त्या सरकारनं केलं. खुर्चीसाठी नाही, खुर्च्या येतात जातात, असे फडणवीस म्हणाले. या महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. सत्तेत एक ताकद असतं, लोहचुंबक असतं. राज्यात पहिल्यांदा 50 आमदारांनी, त्यात 9 मंत्री यांनी सरकार सोडून विरोधकांसोबत येण्याचा निर्णय केला. ज्या प्रकारे वागणूक मिळत होती, सरकार सुरू होतं. त्यांना माहीत होतं, की सरकार असचं चालवलं, तर पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही, असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदेंचं कौतुक

फडणवीस म्हणाले, मनापासून अभिनंदन करीन एकनाथ शिंदे यांचं. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. ते बाहेर पडले तेव्हा ठरलं नव्हतं की सरकार येईलच. असं घडलं नसतं तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं, बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांशी जर फारकत घेतली जात असेल, ज्यांच्याशी लढा केला त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत असेल. ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जावं लागत असेल. सावरकरांचा अपमान रोज सहन करायचा. दाऊदशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्याविरोधात बोलता येत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक हे सहन करू शकत नव्हता. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. राज्यासाठी हे आवश्यक होतं म्हणून ते केलं, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.