Cidco Lottery : सिडकोकडून तळोजा येथील 5730 घरांसाठी लॉटरी जाहीर, एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं आवाहन

सिडकोतर्फे तळोजा येथे 5730 सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

Cidco Lottery : सिडकोकडून तळोजा येथील 5730 घरांसाठी लॉटरी जाहीर, एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं आवाहन
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:57 PM

नवी मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या 5730 घरांची सोडत (Cidco House Lottery) आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं काढण्यात आली आहे. लॉटरी काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची निवड करण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते. लॉटरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थीना याचा फायदा होणार आहे. सिडकोनं तळोजा नोड साठी लॉटरी काढली आहे. 73 व्या प्रजासत्ताक निमित्ताने या गृहनिर्माण योजनेला सुरवात होणार असून ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. 24 फेब्रुवारी पर्यत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे, एकूण घरांपैकी प्रधान मंत्री आवास योजने साठी 1524 घर उपलब्ध असून उर्वरित 4206 सर साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत.

महिनाभर प्रक्रिया

73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने 5730 घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या 5730 घरं तळोजा येथे गृहनिर्माण योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 1524 घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.या मधील लाभार्थ्यांना अडीच लाखाच्या अनुदानाचा लाभ होणार आहे. उर्वरित घर सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्व नागरिकांच्या परवडणाऱ्या घरांसाठी शासन कटिबद्ध आहे. सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होत असून 24 फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचंही मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

सिडकोचा 5730 घरांचा प्रकल्प

सिडकोतर्फे तळोजा येथे 5730 सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोची एक नवीन महागृहनिर्माण योजना सुरु होत असल्याची माहिती सिडकोच्यावतीनं देण्यात आली आहे. नवी मुंबईतील तळोजा नोडमधील 5730 सदनिका यामध्ये उपलब्ध असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य प्रवर्ग यामध्ये पात्र असतील.

इतर बातम्या:

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 26 January 2022

Budget 2022 : गरिबांच्या हाती जास्त पैसे देण्याची गरज, दुकान – सलून यांच्यासाठी सरकारने ECLGS ची करावी घोषणा !

Eknath Shinde said CIDCO has launched a new scheme of 5730 tenements in Taloja Navi Mumbai

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.