वॉटर टॅक्सी प्रकल्पामुळं सागरी प्रवासाचा मार्ग सुकर होईल : एकनाथ शिंदे
मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळं लोकांचा प्रवास सागरी मार्गाने सुकर होईल, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईकरांचा (Navi Mumbai) मुंबईचा (Mumbai) प्रवास अखेर वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, आता वॉटर टॅक्सीमुळे (Water Taxi) 30 मिनिटांत नवी मुंबईकरांना मुंबईत जाता येणार. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळं लोकांचा प्रवास सागरी मार्गाने सुकर होईल, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. 700 किमीचा सागरी किनारा आहे. यामुळे सागरी प्रवासाचा पर्याय आहे. पहिल्या टप्प्यात भाऊचा धक्का ते नवी मुंबई हा मार्ग खुला झाला आहे. सागरी प्रवास सुरू होऊ देत त्यानंतर इतर सुरु होतील. श्रेयवादामुळे काम थांबले नाही काही अडचणीमुळे उशीर झाला.लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. वाढत्या ट्राफिकमुळे अशा मार्गाची गरज आहे. जसे आम्ही मेट्रो, रोडवर काम असत आहोत तसा सागरी वाहतुकीवर देखील काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणलं आहे.
कोरोना संकटाचा सामना करत असताना आम्ही विकास कामे देखील पूर्ण केली. प्रलंबित असलेला हा प्रकल्प सुरु होत आहे. उशिरा का होईना पण प्रकल्प सुरु झाला. भविष्यात मांडवा अलिबागमध्ये पोप्युलेशन वाढत आहे त्यामुळे अशा सुविधा देणं आवशयक आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करत आहोत.कल्याण, डोंबिवली, मीरा- भाईंदर, ठाणे असा आमचा प्रकल्प करणार आहोत. कोरोनाचं संकट देखील आपल्या समोर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे . केंद्रीय तपासयंत्रणेचा प्रेशर टेक्निकसाठी वापर केला जातो. शिवसेना पक्ष याला घाबरणार नाही. संसदीय कामकाज समितीची महत्त्वाची बैठक होती. त्याबैठकीत चंद्रकांत पाटील नव्हते त्यामुळे त्यांना माहीत नाही . शिवसेना पक्ष संजय राऊत यांच्या सोबत आम्हीं आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काही अडचणी असल्यास मुख्यमंत्र्यांपुढे मांडतील
मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जातो. महाविकास आघाडीत कांग्रेस घटक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी असतील तर त्यांना मुख्यमंत्री यांच्यापुढे विषय मांडावा वाटलं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतील यात काही वावगं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
इतर बातम्या :
नवी मुंबईकरांचा मुंबईला पोहोचण्याचा वेळ 30 मिनिटांवर, वॉटर टॅक्सीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम
1995 पासून नवी मुंबईतील लोकांचा कौल आम्हालाच, आताही आमचीच सत्ता येणार: आमदार गणेश नाईक