मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे तरी कुठे? बोलायला तरी पैसे कुठे लागतात? मुंबई ही सर्वांची आहे. मुंबई ही सर्वांची पोसणारी आई आहे.

मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:01 AM

नवी मुंबई: ठाण्यामध्ये टिपून टिपून मारताहेत. मुख्यमंत्र्यांना असे वाटते की अख्खं ठाणे माझ्या हातात असावं. शरद पवार यांनी एवढं वर्ष राजकारण पण त्यांच्या बारामतीत असं कधी झालं नाही, असं सांगतानाचत्यांना साथ दिली नाही तर कुणाचं हॉटेल तोडून टाकलं, कुणाचं घर तोडून टाकलं. म्हणजे ते मुख्यमंत्री नाहीत तर व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, अशी टीका राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

नवी मुंबईत आगरी कोळी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते. कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काय अंदाज नाही. गुन्हा कोणताही असो तोही सांगता येणार नाही. माझ्या आयुष्यात पहिल्या 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाले, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सरकार म्हणजे कहर आहे. ज्या पद्धतीने सरकार वागतं. ती पद्धत कौतुकास्पद आहे. हम करो से कायदा ठीक आहे. थोडे दिवस हुकूमशाहीही लोक सहन करतील. हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही. लोकशाहीवर आता विश्वासच नाहीये, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना तीनचा वार्ड असावा असे नक्की झाले होते. त्यावर 1500 कोटी खर्च झाला. आता म्हणतात चारचा वार्ड करा. आपल्या खिशातून कुठे जाणार आहेत पैसे? परत 1500 कोटी जाणार, असं ते म्हणाले.

कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे तरी कुठे? बोलायला तरी पैसे कुठे लागतात? मुंबई ही सर्वांची आहे. मुंबई ही सर्वांची पोसणारी आई आहे. ही आई पोसणारी आहे म्हणून मुंबईकडे लोक येतात. पण या मुंबईचा तुकडा पडण्याच्या काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

नितेश राणेंच्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. मी औरंगजेब क्रूर नव्हता असं मी म्हटलं नव्हतं. मी एका मंदिरासंदर्भात बोललो होतो आणि मी ज्या मंदिरा संदर्भात बोललो त्या संदर्भातले पुरावे लवकरच देईल, असं त्यांनी जाहीर केलं.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...