कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबईत टेस्टिंगवर भर, जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन 'ब्रेक द चेन' अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे (Emphasis on corona testing in Navi Mumbai to prevent the third wave of corona 2 lakh 18 thousand tests did in July).
जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या
याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 1 लाख 63 हजार 506 अँटिजेन तर 52 हजार 910 आरटी-पीसीआर टेस्टचा समावेश आहे. दिवसाला जवळपास 8 हजार नागरिकांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 13 लाख 94 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वात जास्त असणाऱ्या गर्दीचा ठिकाण एपीएमसीच्या पाची बाजारपेठ मध्ये दिवसात 2000 चाचण्या होत आहे. त्यानुसार दररोज संध्याकाळी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वेबसंवादद्वारे चर्चा केली जात आहे. यात कोरोनाविषयीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.
दैनंदिन वेबसंवादामधील चर्चेतील निरीक्षणानुसार रुग्ण आढळलेल्या इमारतीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लक्षणे नसलेली परंतु कोविडची लागण झालेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी टेस्टींग उपयुक्त ठरत असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट केले आहे.
दरम्यान, टेस्टिंग हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास केल्या जाणाऱ्या टेस्टिंगला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.
कोरोनामुळे आगळा वेगळा फ्रेंडशिप डे; पुढील मैत्रीदिनापर्यंत 5 मित्र 25,000 झाडं लावणारhttps://t.co/PzUPZ7Fvp7#FriendshipDay #Panvel #Friends #TreePlantation
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
Emphasis on corona testing in Navi Mumbai to prevent the third wave of corona 2 lakh 18 thousand tests did in July
संबंधित बातम्या :
राज्यावर विविध संकटांचा डोंगर, मात्र पणनमंत्र्यांचा गर्दी करत रस्त्यावरच वाढदिवस
4 दिवसांत 22 हजार चाचण्या, पनवेलचा पॉझिटिव्हिटी रेट कमी, आयुक्तांच्या मोहिमेला यश