नवी मुंबईत महिन्याभरापासून कोरोना रुग्ण पन्नाशीतच; परिस्थिती आटोक्यात मात्र कोरोनामुक्ती कधी?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महापालिका योग्य पद्धतीने उपयोजना करत आहे. शिवाय दुसऱ्या लाटेवर मात करण्यास पालिकेला यश आले होते. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना केंद्र, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना सेवा व उपचार देण्यासाठी पालिकेची पूर्ण तयारी आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णसंख्या पन्नाशीच्या जवळपास आहे. मात्र, ती कमी करण्यात पालिकेला अद्याप यश येत नसल्याचे दिसत आहे. तर आता गणपतीसह विविध सण येऊ घातले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तुर्भे विभागातील झोपडपट्टी परिसरात रुग्णसंख्या दोन-तीन असून इंदिरानगर कोरोनमुक्त झाले आहे. त्यामुळे उर्वरित नवी मुंबई कोरोनमुक्त कधी होणार असा प्रश्न नागरिक पडला आहे. शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. पालिकेचे कारवाई पथक नाममात्र उरले आहे का असा सवाल नागरिक करत आहेत. जर अशा परिस्थितीत रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न झाल्यास लवकरच शहर कोरोनमुक्तीकडे जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Fifty corona patients in Navi Mumbai for over a month; the situation is under control)
दुसऱ्या लाटेवर मात करण्यास पालिकेला यश
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महापालिका योग्य पद्धतीने उपयोजना करत आहे. शिवाय दुसऱ्या लाटेवर मात करण्यास पालिकेला यश आले होते. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना केंद्र, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना सेवा व उपचार देण्यासाठी पालिकेची पूर्ण तयारी आहे. शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एकही रुग्णालयात रुग्ण नाही. शिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून प्रतिदिन 1 ते 2 रुग्ण दगावत आहे. शहरातील आठ विभागांपैकी बेलापूर वगळता सर्व विभागात एक अंकी रुग्णसंख्या आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी
गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेने कोरोना तपासणीत वाढ केली आहे. पालिकेच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णाची अँटीजेन तसेच आवश्यकता वाटल्यास आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तसेच ज्या विभागात रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. पालिका आरोग्य विभागात 6 हजार 910 पैकी तब्बल 5 हजार 884 बेड रिकामे आहेत. 60 पैकी 25 रुग्णालयांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नवी मुंबईमधील प्रत्येक विभागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण संख्या 100 पेक्षा कमी आहे. सहा ठिकाणी 10 पेक्षा कमी रुग्ण राहिले आहेत. तब्बल 97.37 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. फक्त 0.86 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.
सणासुदीच्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता
सध्या रुग्ण संख्या पन्नाशीतच असली तरी येत्या सणासुदीच्या काळात ही रुग्णसंख्या शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गणेश मंडळासह नवरात्र मंडळांना नियम पाळण्यासाठी सक्त ताकित देऊन लेखी आदेश देणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आयसीयूमध्ये 135 जण उपचार घेत असून रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबलेला नाही. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे व तिसरी लाट येणारच नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. (Fifty corona patients in Navi Mumbai for over a month; the situation is under control)
टुरिस्ट गाईड होण्यासाठी 700 जणांना पर्यटन विभागाकडून ऑनलाईन प्रशिक्षण #MaharashtraTourismhttps://t.co/rVa5KZlNyp
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
इतर बातम्या
पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ