Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु

घणसोली येथील अंबिका ज्वेलर्सवर 14 नोव्हेंबर रोजी दरोडा पडला होता. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस 15 दिवस या प्रकरणाचा तपास करीत होते.

नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु
नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 8:39 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली येथील अंबिका ज्वेलर्सवरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींकडून जवळपास एक किलो सोने आणि काही चांदी हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये दोन व्यक्ती याच व्यवसायातील कारागीर असून उर्वरित अट्टल गुन्हेगार आहेत.

14 नोव्हेंबर रोजी पडला होता दरोडा

घणसोली येथील अंबिका ज्वेलर्सवर 14 नोव्हेंबर रोजी दरोडा पडला होता. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस 15 दिवस या प्रकरणाचा तपास करीत होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या 18 ते 20 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. हे पथक दिवस रात्र चोरट्यांचा शोध घेत होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना पाच जणांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. अन्य तीन जण फरार असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

राजस्थानमधून आरोपींना केले जेरबंद

दुकानातील सीसीटीव्ही निकृष्ट दर्जाचे असल्याने पोलिसांना तपासात मोठा अडथळा निर्माण होत होता. याच परिस्थितीचा फायदा घेत घणसोली येथून रिक्षाने ठाणे व तेथून राज्यस्थानमध्ये या दरोडेखोरांनी पलायन केले होते. दुकानातील डीव्हीआर आरोपींनी काढून नेला होता. परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीतही आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. आयुक्त बिपीनकुमार सिंग व गुन्हे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या 18 ते 20 कर्मचाऱ्यांचे पथक यांनी दिवसरात्र तपास करून ही कामगिरी फत्ते केली. जवळपास 700 सीसीटीव्हीचे परीक्षण करून आरोपींना राजस्थान येथून जेरबंद केले. नवी मुंबई गुन्हे शाखेची 2021 मधील ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे. (Five arrested in Navi Mumbai robbery case, search for three absconding accused begins)

इतर बातम्या

VIDEO | उल्हासनगरात दारूसाठी पैसे मागत गावगुंडांचा हैदोस; पोलिसांनी त्याच परिसरातून काढली गावगुंडांची ‘वरात’

बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.