आसूडगावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा, भूमिपुत्र गणेशभक्त दी बा पाटील यांच्या नावावर ठाम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचे आजही पाहायला मिळत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झालेला आहे. दरम्यान गणपती बापाची सजावट म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखावे बनवण्यात आलेले आहेत. आसूडगाव येथील माजी सरपंच विजय भोपी यांनी देखील घरगुती गणेशाची आरास दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फलक असलेला देखावा साकारलेला आहे. विमानतळ ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे, त्या ठिकाणचे हुबेहूब चित्र आपल्याला पाहायला मिळते. देखावा पाहिला तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहे हे सिद्ध होते. (Ganesh devotees from Asudgaon realize the scene of Navi Mumbai Airport)
काय म्हणाले विजय भोपी?
विजय भोपी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गणपती बाप्पा विघ्नहर्ता, बुध्दीचा देवता आहे. आणि बाप्पा या महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे सरकारला सदबुध्दी देईल आणि नवी मुंबई विमानतळाला नाव दि. बा. पाटील हेच दिले जाईल, हाच देखावा साकारण्याचा मुख्य उद्देश आहे. पुढे ते म्हणतात, नवी मुंबईतला आगरी समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय, ते केवळ दि. बा. पाटील या नेत्यामुळे आहे. विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती, तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. इथल्या लोकांमध्ये दिबांबद्दल असलेला जिव्हाळा यातून निर्माण झालाय. आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानातळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतो.
विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याची मागणी जोर धरतेय
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता. विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला होता. (Ganesh devotees from Asudgaon realize the scene of Navi Mumbai Airport)
Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला अवश्य करुन पहा या 5 फ्युजन पाककृतीhttps://t.co/rc0HxQcjdN#GaneshChaturthi2021 |#Recipe |#Festival |#Ganpati
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
इतर बातम्या