‘जेवढे आमचे नगरसेवक फोडाल त्यापेक्षा तुपटीने तुमचे फोडू’, गणेश नाईकांचा शिवसेनाला इशारा

| Updated on: Feb 09, 2021 | 3:31 PM

तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडणार त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू," असा इशारा भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विरोधकांना दिला.

जेवढे आमचे नगरसेवक फोडाल त्यापेक्षा तुपटीने तुमचे फोडू, गणेश नाईकांचा शिवसेनाला इशारा
गणेश नाईक, आमदार
Follow us on

नवी मुंबई : “तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडणार त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू,” असा इशारा भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विरोधकांना दिला. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये भाजपला गळती लागली असून अनेक स्थानिक नेते आणि कार्य़कर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर नाईक यांनी वरील वक्तव्य केले. ते नेरुळ येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. (Ganesh Naik criticizes Shivsena on resignation of BJP corporators )

“जर तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार जण फोडू, चार फोडले तर आठ फोडू, तुम्ही आमचे जेवढे नगरसेवक फोडाल त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू,” असे नाईक म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना मी एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सूचक इशाराही दिला.

आतापर्यंत 14 नगरसेवकांची भाजपला सोडचिठ्ठी

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे येथील राजकीय वारे तापले आहे. नवी मुंबईतील नगरसेवक फोडाफोडीला उधाण आलंय. मागील वर्षी सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगसेवकांनी नाईक यांची साथ सोडली. त्यानंतर आतापर्यंत येथे 14 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. याच कारणामुळे गणेश नाईक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

याविषयी विचारले असता, 1997 पासून अनेक नगसेवक आमची साथ सोडून जात आहेत. तरीदेखील नवी मुंबईकरांनी सत्तेचे दान आमच्याच पारड्यात टाकलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो अथवा कोणतीही मोठी आघाडी असो महापौर आमचाच होणार, असा दावा नाईक यांनी केला. तसेच, भाजपला सोडून जाणाऱ्यांचे देव भले करो, असा टोलाही त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या नगरसेवकांना लगावला.

शिवसेनेच्या गुंडागर्दीला घाबरु नका

तसेच पुढे बोलताना, “शिवसेनेकडून दम देऊन नगरसेवक फोडले जात असल्याचे सांगतिले गेल्याने गुंडागर्दीला अजिबात घाबरू नका. ज्यावेळी काही वेळ येईल त्यावेळी मला फोन करा. मी अर्ध्या रात्रीला हजर होतो, असे म्हणत येथील स्थानिक काकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.


इतर बातम्या :

नवी मुंबईत गणेश नाईकांना आणखी एक मोठा धक्का, हळूहळू पक्षाला पडणार का खिंडार?

‘राष्ट्रवादीत असताना गणेश नाईकांना मान होता, पण भाजपच्या कार्यक्रमात बसायला खुर्चीही मिळत नाही’

गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’; शिवसेनेची जळजळीत टीका

(Ganesh Naik criticizes Shivsena on resignation of BJP corporators )