सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात, पात्र अर्जदारांना सिडकोचा दिलासा
सर्व भूखंडांचे आता सीमांकन करून त्याला कुंपण घातले जाणार आहे. प्रत्येक भूखंडांवर संबंधित भूखंडाचा तपशील दर्शविणारे फलक लावले जाणार आहेत. त्यावर भूखंड क्रमांक, सेक्टर, नोड व भूखंडाचे व क्षेत्र, बारकोड डिस्प्ले या बाबींचा समावेश असणार आहे.
नवी मुंबई : सिडकोतर्फे विविध नोडसमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. नियमांनुसार दिलेल्या मुदतीत भूखंडाची रक्कम भरणे आवश्यक असते. परंतु विविध कारणांमुळे अनेक अर्जदारांना भूखंडांचा पहिला हप्ता भरणे शक्य होत नाही. अशा अर्जदारांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा दिलासादायक निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. सिडकोने आतापर्यंत विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्जदारांना आपल्या भूखंडांचे निश्चित स्थान व सीमांकन करण्यास मदत होणार आहे. (Geo-tagging of plots sold by CIDCO, a relief to eligible applicants)
भूखंडाचे सीमांकन करुन कुंपण घालणार
याशिवाय सर्व भूखंडांचे आता सीमांकन करून त्याला कुंपण घातले जाणार आहे. प्रत्येक भूखंडांवर संबंधित भूखंडाचा तपशील दर्शविणारे फलक लावले जाणार आहेत. त्यावर भूखंड क्रमांक, सेक्टर, नोड व भूखंडाचे व क्षेत्र, बारकोड डिस्प्ले या बाबींचा समावेश असणार आहे. मागील वर्षभरात सिडकोने विविध क्षेत्रफळांचे पाचशेपेक्षा अधिक भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. यात निवासी तथा वाणिज्यिक वापराच्या मोठ्या भूखंडांसह लहान बंगलो प्लॉटचा सुद्धा समावेश आहे.
सिडकोच्या भूखंड विक्रीला चांगला प्रतिसाद
सिडकोच्या या भूखंड विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना निश्चित करून दिलेला भूखंडाचा पहिला हप्ता भरता आलेला नाही. त्यामुळे दुसरा हप्तासुद्धा रखडला आहे. सिडकोच्या नियमांनुसार दिलेल्या मुदतीत पहिला व त्यानंतर दुसरा हप्ता भरणे आवश्यक असते. पहिला हप्ता भरण्यास विलंब झालेल्या अर्जदारांना आता तीन महिन्यांची तर दुसरा हप्ता भरण्यासाठी दहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पात्र प्रकरणांमध्येच अर्जदाराला लागू असलेल्या विलंब शुल्कासहित ही मुदतवाढ देण्यात येणार आहे. मुदतवाढीनंतरही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरल्यास वाटप केलेला भूखंड नियमानुसार रद्द केला जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Geo-tagging of plots sold by CIDCO, a relief to eligible applicants)
Video: ताई, मामा माझी वीज कापली, लाखो रुपयांचा ऊस जळतोय; सुप्रिया सुळे,दत्तात्रय भरणेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्नhttps://t.co/pWFQn6I5NP#SupiryaSule | #DattatrayBharane | #NCP | #Indapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
इतर बातम्या