नवी मुंबईत गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन

नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रुपाली अंबुरे यांच्या आदेशाने नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व 20 पोलीस स्टेशन स्तरावर गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदार (एकूण 46) यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

नवी मुंबईत गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन
Navi Mumbai Police
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 11:16 AM

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रुपाली अंबुरे यांच्या आदेशाने नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व 20 पोलीस स्टेशन स्तरावर गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदार (एकूण 46) यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रभारी अधिकारी (पासपोर्ट विभाग) डॉ. विशाल माने आणि नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रुपाली अंबुरे यांच्याकडून गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, परदेशी नागरिक या विभागांशी संबंधित कामकाजाबाबत आणि विहित वेळेत प्रकरणे निकाली काढून नागरिकांशी सौजन्याने वागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीमध्ये नवी मुंबई पोलीस पारपत्र विभाग, विशेष शाखेकडून सर्व पोलीस स्टेशनसाठी एक वर्षाकरीता 24@7 कोर्ट चेकर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच पासपोर्ट ऑनलाईन प्रणालीवर नवीन पनवेल पोलीस स्टेशन ऐवजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन असे नाव बदल करण्यासाठी पाठपुरावा करुन नवीन पनवेल पोलीस स्टेशन ऐवजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन असा नाव बदल करण्यात आला.

नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर

भाजपा आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत नवी मुंबईत सुरू असलेल्या कारभारावरून आयुक्तांना चांगलेच धारेवर धरलंय. सध्या राज्याचा कारभार घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकाप्रमाणे सुरू आहे. पेशव्यांनी पात्रता नसलेल्यांना अधिकार सोपवल्याने त्यांनी ज्याप्रकारे जनतेची लूट करत जुलूम केले तशी परिस्थिती राज्य, जिल्हा आणि नवी मुंबई स्तरावर सुरू असल्याचे वक्तव्य करत आमदार गणेश नाईकांनी महाविकास आघाडीसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय. मनपात आयुक्तांना न मानणारे अधिकारी असून आपला बॉस दुसराच असल्याचे सांगतात असा गंभीर आरोप देखील नाईकांनी केलाय. राज्यात चालत असेल पण नवी मुंबईत बाराभाई कारभार चालू देणार नाही, असे ठणकावत याविरोधात लढण्यासाठी आम्ही तत्वर आणि तत्पर असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांची खुर्ची पळवली

नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.