नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रुपाली अंबुरे यांच्या आदेशाने नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व 20 पोलीस स्टेशन स्तरावर गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदार (एकूण 46) यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रभारी अधिकारी (पासपोर्ट विभाग) डॉ. विशाल माने आणि नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रुपाली अंबुरे यांच्याकडून गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, परदेशी नागरिक या विभागांशी संबंधित कामकाजाबाबत आणि विहित वेळेत प्रकरणे निकाली काढून नागरिकांशी सौजन्याने वागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीमध्ये नवी मुंबई पोलीस पारपत्र विभाग, विशेष शाखेकडून सर्व पोलीस स्टेशनसाठी एक वर्षाकरीता 24@7 कोर्ट चेकर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच पासपोर्ट ऑनलाईन प्रणालीवर नवीन पनवेल पोलीस स्टेशन ऐवजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन असे नाव बदल करण्यासाठी पाठपुरावा करुन नवीन पनवेल पोलीस स्टेशन ऐवजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन असा नाव बदल करण्यात आला.
भाजपा आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत नवी मुंबईत सुरू असलेल्या कारभारावरून आयुक्तांना चांगलेच धारेवर धरलंय. सध्या राज्याचा कारभार घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकाप्रमाणे सुरू आहे. पेशव्यांनी पात्रता नसलेल्यांना अधिकार सोपवल्याने त्यांनी ज्याप्रकारे जनतेची लूट करत जुलूम केले तशी परिस्थिती राज्य, जिल्हा आणि नवी मुंबई स्तरावर सुरू असल्याचे वक्तव्य करत आमदार गणेश नाईकांनी महाविकास आघाडीसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय. मनपात आयुक्तांना न मानणारे अधिकारी असून आपला बॉस दुसराच असल्याचे सांगतात असा गंभीर आरोप देखील नाईकांनी केलाय. राज्यात चालत असेल पण नवी मुंबईत बाराभाई कारभार चालू देणार नाही, असे ठणकावत याविरोधात लढण्यासाठी आम्ही तत्वर आणि तत्पर असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय.
गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस सज्ज, कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आयुक्तांचं आवाहनhttps://t.co/Dv1Z8MKUX4#Ganeshotsav #NaviMumbai #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
संबंधित बातम्या :
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांची खुर्ची पळवली
नवी मुंबईतील अनागोंदी कारभाराबाबत गणेश नाईकांनी आयुक्तांना धरले धारेवर