मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालकांचा अजब कारभार, कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार

एकिकडे राज्यभरात कोरोनाशी लढा सुरु आहे, तर दुसरीकडे नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केटमध्ये संचालकांचा अजब कारभार सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.

मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालकांचा अजब कारभार, कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 1:38 AM

नवी मुंबई : एकिकडे राज्यभरात कोरोनाशी लढा सुरु आहे, तर दुसरीकडे नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केटमध्ये संचालकांचा अजब कारभार सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. या ठिकाणी बाजार समितीला उघडपणे आव्हान देत कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत महापालिका आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. असं असताना देखील ओळखपत्र देण्याचा कारनामा भाजीपाला मार्केट आवारात करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीला आव्हान देणाऱ्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय (Illegal charges of identity card by labours in APMC Navi Mumbai).

बाजार समितीच्या नाकावर टिच्चून ओळखपत्रासाठी कामगारांकडून 200 रुपये घेण्याचं परिपत्रक काढण्यात आलंय. या प्रकाराने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे बाजार समितीची मोठी बदनामी होत आहे. अशाप्रकारे पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचे प्रकार घडू नये म्हणून एपीएमसी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. शिवाय सुरक्षा रक्षकांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

अँटीजेन चाचणी तपासणी करणाऱ्यांना मोफत ओळखपत्र देण्याचा नियम

अँटीजेन चाचणी तपासणी ज्यांनी केली असेल त्यांना मोफत ओळखपत्र मिळणार आहेत. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नये असे थेट आवाहन बाजार समिती प्रशासन करत आहे. दुसरीकडे ओळखपत्राला पैसे आकारले जात असल्याने मजुरांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजीपाला मार्केटच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी ओळखपत्राला 200 रुपये घेणार असल्याचा मेसेज पाठवला होता. पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी संचालकांच्या ए विंगमध्ये लेटरहेड घेऊन आलेल्या लोकांना पैसे देऊन ओळखपत्र वाटप सुरु असल्याचं दिसून आलं.

पैसे घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा बाजार समिती सचिवांचा इशारा

रक्ताचे पाणी करून काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांकडून अशा प्रकारे पैसे घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. या प्रकारांना वैतागून मजूर मार्केट सोडून गेल्यास व्यापार ठप्प होण्याची भीती काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय. अशा प्रकारे कोणी पैसे घेऊन ओळखपत्र दिले असेल तर गुन्हा दाखल करणार असल्याचे बाजार समिती सचिवांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी संचारबंदीमध्ये टोकन पद्धतीने आणि आता ओळखपत्राच्या नावाखाली पैसे उकळण्याचे काम भाजीपाला मार्केटमध्ये सुरु असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला

रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार, सातशे डझन आंब्याच्या निर्यातीची तयारी

कांदा शेतकऱ्यांना रडवणार, कांद्याचे दर 500 रुपये क्विंटलपर्यंत घसरले

व्हिडीओ पाहा :

Illegal charges of identity card by labours in APMC Navi Mumbai

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.