VIDEO: मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, सोमय्या यांचा सवाल आणि चौकशीची मागणी

रश्मी ठाकरे या 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्रं देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यांबाबत काहीच बोलत नाहीत. सरपंच मात्र बंगलेच अस्तित्वात नसल्याचं सांगतात. मग यापैकी खरे कोण? रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री की सरपंच? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, सोमय्या यांचा सवाल आणि चौकशीची मागणी
मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, सोमय्या यांचा सवाल आणि चौकशीची मागणी
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:13 PM

अलिबाग: रश्मी ठाकरे या 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्रं देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) या बंगल्यांबाबत काहीच बोलत नाहीत. सरपंच मात्र बंगलेच अस्तित्वात नसल्याचं सांगतात. मग यापैकी खरे कोण? रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री की सरपंच? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे का? असा सवाल भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी केला. तसेच सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात येऊन तसा अर्जही दिला आहे. सोमय्या आधी कोर्लई गावात आले. या ठिकाणी ग्रामसेवकाला निवेदन दिल्यानंतर ते थेट रेवदंडा पोलीस ठाण्यात आले आणि पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करावा म्हणून एक अर्ज दिला आहे.

किरीट सोमय्या आज कोर्लई गावात आले होते. त्यानंतर ते रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. सरपंच म्हणतात मुख्यमंत्र्यांचे बंगले अस्तित्वात नाहीत. मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. म्हणून पोलीस ठाण्यात आलो. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसांना केली. चर्चा व्यवस्थित झाली. ग्रामसेवकांशी भेट झाली, असं सोमय्या यांनी सांगितलं. कोर्लईत शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखं मला मारलं नाही. तिथे तर लाठीकाठी आणि दगडं घेऊन आले होते, असं त्यांनी सांगितलं.

बंगले गायब कसे झाले?

कोर्लई ग्रामपंचायतीला व्यवस्थित भेट झाली. मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही. ग्रामपंचायत हे मुख्यमंत्र्यांचं प्रतिनिधीत्व करतात. आम्ही ग्रामसेवकाला कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती हे दोन दिवसात कळवतो, असं आश्वासन ग्रामसेवकाने दिलं आहे. दोन चार तासात बंगले कसे गायब झाले. सकाळी आहे, दुपारी नाही. रश्मी ठाकरेंना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. बंगल्याची वास्तविकता तपासण्यासाठी मी आलो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

खरंखोटं करण्यासाठी आलो

सोमय्यांनी कोर्लई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. काही कागदं बघण्यासाठी मागितली होती. आम्ही माहितीच्या अधिकारात हे कागदपत्रं मिळवले होते. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 7 जून 2019 रोजी ठराव केला. सौ. वायकर आणि सौ. रश्मा ठाकरे यांच्या नावाने 19 बंगल्याची घरपट्टी करण्याचा हा ठराव होता. त्यांची तशी मागणी होती. त्यानंतर टॅक्स भरला गेला. असेसमेंट उताऱ्यालाही त्याची नोंद आहे. पण मधल्या काळात बंगले नाहीत असं सरपंच म्हणाले. त्यामुळे खरं खोटं करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही ग्रामसेवकाला माहिती मागितली. त्यावर तुम्ही जी कागदपत्रं दिली. त्या आधारे माहिती देऊ असं ग्रामसेवक म्हणाले, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

संबंधित बातम्या:

VIDEO: सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण

VIDEO: मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली, सोमय्यांचा गंभीर आरोप

VIDEO: संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; किरीट सोमय्या म्हणतात, होय, मी…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.