Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस, स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश

कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्ल्यांची रेल्वे सेवा सुरु आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणाऱ्या 20 ते 25 गाड्या रोज येत असतात. अशात प्रवाशांकडून बऱ्याच तक्रारी भारतीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी पनवेल स्टेशन प्रबंधक यांची भेट घेत प्रवाशांना होत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचला.

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस, स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश
Panvel Railway Station
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 11:39 AM

नवी मुंबई : कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्ल्यांची रेल्वे सेवा सुरु आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणाऱ्या 20 ते 25 गाड्या रोज येत असतात. अशात प्रवाशांकडून बऱ्याच तक्रारी भारतीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी पनवेल स्टेशन प्रबंधक यांची भेट घेत प्रवाशांना होत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचला.

यावेळी त्यांच्यासह पनवेल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, यशवंतराव ठाकरे – पनवेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष, डॉ. मनिष बेहरे, पनवेल प्रवासी संघ सदस्य, कुणाल लोंढे, रेल्वे स्थानक स्थानीय प्रवासी संघटनेचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी नागपूर ते गोवा, मडगाव रेल्वे सेवा ही फक्त सन आणि उत्सवांच्या वेळीच सुरु असते. मात्र, पनवेल आणि आजूबाजूच्या शहरात विदर्भात तसेच कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही रेल्वे सेवा दररोज सुरु करावी अशी प्रमुख मागणी केली.

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस

पनवेल रेल्वे स्थानकामध्ये 7 फलाट असून त्यातील 4 उपनगरी तर 3 लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. लांब पल्ल्यांच्या गाड्या 5, 6 आणि 7 प्लॅटफॉर्म वरुन वाहतूक सुरु असते. मात्र, अशात प्रवाशांना शौचालयासाठी फक्त एकच स्वचछतागृह आहे. त्यात पाण्याची व्यवस्था नाही. परराज्यात जाणाऱ्या गाड्यांची वेळ मागे पुढे होत असते. बऱ्याचदा वाट पाहावी लागते. रेल्वे स्थानकात एकच विश्राम गृह आहे, ते कमी पडत आहे.

प्रवाशांना ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्म वरच झोपावे लागते. बसण्यासाठी असलेली बाकही मोडकळीस आलेली आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी असलेली नळ सुरुच असलेले पाहायला मिळतात. त्याचे पाणी सुद्धा प्लॅटफॉर्मवर वाहत असते. त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत. प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक डीपी आणि त्यातील वायरी बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधा तसेच सर्व प्लॅटफॉर्मवर एक्सलेटर सुरु करावे जे फक्त एकच ठिकाणी सुरु आहे. या आणि अशा अनेक समस्या पनवेलचे स्टेशन प्रबंधक यांच्या समोर मांडल्या.

स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश

अभिजीत पाटील यांची नुकतीच रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या समितीवर निवड होताच अभिजीत पाटील यांनी कामाचा तडाखा सुरु केला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन आणि प्रवशांना जाणवलेल्या समस्या अभिजीत पाटील यांनी स्टेशन प्रबंधक यांच्यासमोर मांडल्या आणि त्या समस्या सोडविण्याचे आपले आद्य कर्तव्य असल्याचे ठणकावून सांगितले. यानंतर स्टेशन बंधक यांनी लगेच समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबधित अधिकारी आणि कांत्रादरास दिले.

संबंधित बातम्या :

लोकलमध्ये प्रवासी बेसावध असताना संधी साधली, हातातून महागडा मोबाईल हिसकावला, पोलिसांनी तिघांना कसं पकडलं?

नवी मुंबई विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा

कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.