MNS : नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आर्थर रोड जेलला जायचं का? संदीप देशपांडेंचा खोचक सवाल

भाजप (BJP) पाठोपाठ आत्ता मनसे (MNS) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिकेत पाहायला मिळतेय.

MNS : नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आर्थर रोड जेलला जायचं का? संदीप देशपांडेंचा खोचक सवाल
नवाब मलिक यांच्या विरोधात मनसे आक्रमक Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 5:31 PM

नवी मुंबई : भाजप (BJP) पाठोपाठ आत्ता मनसे (MNS) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिकेत पाहायला मिळतेय. नवी मुंबईतील कोकण भवन कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्र संदीप देशपांडे यांनी विभागाच्या आयुक्तांना दिले..तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. संदीप देशपांडे यांनी नवाब मलिकांवर खोचक टीका केलंय.

कौशल्य विकास योजनेचा कारभार बोगस

आम्ही कौशल्य विकास योजनेचा जो कारभार किती बोगस आहे हे पुराव्या सह त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना आम्ही विनंती केली आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. पण कंपन्या रजिस्ट्रेशन झालं पाहिजेत. या विभागाचा शंभर कोटीच्यावर टर्न ओवर आहे आणि कंपन्या रजिस्ट्रेशन होत नाही. मनसे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणार ज्याकडे भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. राज साहेबांनी पत्राच्या माध्यमातून त्यांना भूमिपुत्रांनसाठी रोजगार निर्मिती करा, असं सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

आर्थर रोड जेलला जायचं का?

आमचा नवाब मलिकांना विरोध नाही परंतु नवाब मलिक यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार विभाग येतात. ते जावून जेल मध्ये बसले आहेत. आम्ही जॉब कोणाला विचारयचा. आम्हाला काम करावे लागणार आहे कारण मंत्री जेल मध्ये आहे. राजीनामा द्यायचा की नाही त्यांचा पक्ष ठरवेल. आमचा प्रश्न आहे की उदया आम्हाला मंत्री भेटले नाही तर आम्ही आर्थर रोड जेलला भेटण्यासाठी जायचं का? अशी खोचक टीका नवाब मलिकांवर संदीप देशपांडे यांनी केली.

आम आम्ही त्यांच्या विभागाचा कारभार कसा आहे त्यांना दाखवून दिलाय.त्यांच्याकडे कर्मचारी नाही, कंपन्या बोगस रजिस्ट्रेशन आहे. मनसे कडून आम्ही विनंती केलीय आम्ही कंपन्या रजिस्ट्रेशन करून द्यायला तयार आहोत. साडे सात हजार नोकऱ्या बोगस आहेत, आम्ही पुराव्यासकट सिद्ध करुन दिलेलं आहे. नाही झाले तर आम्ही आर्थर रोडला निवेदन देण्यासाठी जावू असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. भूमीपुत्रांना रोजगार मिळावे विभागांना प्रयत्न केला पाहिजे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

इतर बातम्या:

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल

Sanjay Raut : शिवसेना भवनात संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद, वेळही ठरली, टार्गेटवर कोण?

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.