नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांच्या नावासाठी कृती समितीने गाठली दिल्ली

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाशी चर्चा करताना विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने सिडको नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी दिल्ली येथे शिष्टमंडळाच्या बैठकीत केला.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांच्या नावासाठी कृती समितीने गाठली दिल्ली
Kruti Samiti Navi Mumbai
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 11:50 AM

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी कृती समितीने थेट दिल्ली गाठली. यावेळी त्यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाशी चर्चा करताना विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने सिडको नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी दिल्ली येथे शिष्टमंडळाच्या बैठकीत केला.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची भेट

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही भेट घेतली. समितीने त्यांचे अभिनंदन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आभार व्यक्त केले. या भेटीत विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा करण्यात आली.

मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन

कपिल पाटील यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही त्यांच्या दालनात जाऊन भेट घेण्यात आली. नामदार शिंदे यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारुन अध्यक्ष दशरथ पाटील आणि समितीचे म्हणणे ऐकून घेतले. याविषयी बोलताना जोतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकार नेहमी भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच, सिडको नामकरणाची घाई का करीत आहे असा सवालही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. त्याचबरोबर भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, यांच्या सोबत शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, दीपक पाटील, संतोष घरत, विनोद म्हात्रे, नंदेश ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा

‘…तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही’, पनवेलच्या उपमहापौरांचा इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.