प्रियकराबरोबर लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रेयसीची साडेचार लाखांची फसवणूक
या माध्यमातून बंगाली बाबूंची काळी जादू एक प्रकारे गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश मिळाले.
नवी मुंबईः प्रेमभंग झालेल्या प्रेयसीचे आपल्या प्रियकराबरोबर लग्न लावण्यासाठी काळी जादू करतो, असे सांगत सुमारे साडेचार लाखांपेक्षा जास्त पैसे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये उघड झालाय. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरेंच्या नेतृत्वाखाली तपास करून संबंधित गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आलंय. बंगाली बाबाला नवी मुंबई गुन्हे शाखेने अखेर सोमवारी अटक केली. या माध्यमातून बंगाली बाबूंची काळी जादू एक प्रकारे गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश मिळाले. (Navi mumbai Cheating of Rs 4.5 lakh for marrying a lover)
प्रियकराने लग्नास नकार दिल्यानं 26 वर्षे तरुणी डिप्रेशनमध्ये
खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे तरुणी फेब्रुवारी 2021मध्ये प्रेमभंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. सदर युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तिने प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय पाहिजे असल्यास 9930694360 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा, असे लिहिलेली जाहिरात पहिली. तिने सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील इसमाने तो बाबा कबिर खान बंगाली असल्याचे सांगितले. त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये सदर युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळीजादू करावी लागेल, असे सांगितले.
पूजा विधीसाठी लागणार खर्च म्हणून 4,57,000 इतके पैसे घेतले
देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल, असे सांगून वेळोवेळी सदर युवतीकडून पूजा विधिसांठी लागणार खर्च म्हणून 4,57,000 इतके पैसे घेतले. हे करून देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर युवतीने बाबा कबीर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागितले व पोलिसांकडे तक्रार देईन, असे सांगितले. त्यावर बाबा बंगाली याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादू करून अपघात घडवून आणेन व तिला नष्ट करेन, असे धमकावल्याने सदर युवतीने खारघर पोलीस ठाणे येथे 420, 417, 506, 507 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन, काळी जादू नियम 2013 कलम 3 अन्वये 1 जुलै 2021 रोजी गुन्हा नोंद केला होता, या प्रकरणी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आली होती, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीधर गोरे यांनी आपल्या पथक तयार करून आरोपीचे वेगवेगळे गुगल पे क्रमांक, बँक अकाऊंट क्रमांक आणि KYC ची माहिती घेतली. तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करून सीडीआर विश्लेषण केले.
सदर आरोपीने अशा अनेक लोकांना फसवले
सदरच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस कधीही फिर्यादी यांनी प्रत्यक्षात पाहिलेले नसताना, तो कसा दिसतो याच्याबाबत खात्री नसताना आणि वारंवार मोबाईल व राहण्याचे ठिकाण बदलत असताना देखील गुन्हे शाखा पथकाने आरोपीचे मोबाईल क्रमांक, बँक अकाऊंट, बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून कौशल्यपूर्ण तपास करून गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर आरोपीने अशा अनेक लोकांना फसवले असून, आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नमूद आरोपीने कोणास फसविले असल्यास त्यांनी नवी मुंबई गुन्हे शाखा आणि खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
कोण आहे राजकीय गुरु रघुनाथ येमूल ज्याला नेत्याच्या बायकोनं कोठडीची हवा खाऊ घातलीय?
मुंबईत नोर्कोटिक्सकडून एक कोटींचे काश्मिरी चरस जप्त, एका महिला ड्रग्स पेडलरला अटक
Navi mumbai Cheating of Rs 4.5 lakh for marrying a lover