सिडकोची 65 हजार घरांची लॉटरी लांबणीवर, पझेशनसाठीही आणखी 5 महिने प्रतीक्षा

सिडको महामंडळाकडून या महिन्यामध्ये 65 हजार घरांची लॉटरी निघणार होती, तीसुद्धा लांबणीवर पडणार आहे. (Navi Mumbai CIDCO Extension)

सिडकोची 65 हजार घरांची लॉटरी लांबणीवर, पझेशनसाठीही आणखी 5 महिने प्रतीक्षा
सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 4:01 PM

नवी मुंबई : तीन वर्षांपासून घरांचा हप्ता की घरभाडे, अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या सिडकोच्या लाभार्थ्यांना घराचा ताबा घेण्यासाठी आणखी 5 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अंतिम टप्प्यात आलेल्या गृहप्रकल्पांची शेवटच्या टप्प्यातील कामे पुन्हा रखडली आहेत. त्यामुळे घराचा ताबा देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Navi Mumbai CIDCO Extension)

नवी मुंबईत सुरू असलेल्या अनेक विकास सिडकोच्या प्रकल्पांच्या कामाला ब्रेक लागला आहे. सिडकोच्या गृहप्रकल्पांची कामेसुद्धा ठप्प पडली आहेत. याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्यास विलंब होत आहे

तसेच सिडको महामंडळाकडून या महिन्यामध्ये 65 हजार घरांची लॉटरी निघणार होती, तीसुद्धा लांबणीवर पडणार आहे. या लॉटरी मध्ये खारघर वाशी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला पंतप्रधान आवास योजनेतून सिडको घरे बांधणार आहेत. त्यामुळे सिडकोची लॉटरी लांबणीवर पडत आहे.

हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ

दरम्यान, सिडको गृहनिर्माण योजना 2018-19 मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. सिडको महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय.

महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती.

टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय

महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील काही अर्जदारांनी एकही हफ्ता न भरल्याचे तर काही अर्जदारांचे उर्वरित हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित अर्जदारांना थकीत हफ्ते भरण्याकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

गृहकर्जाचा एकही हफ्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत सूट

(Navi Mumbai CIDCO Extension)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.