नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले
नवी मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 10:52 AM

नवी मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी शनिवारी याबाबतचे निर्देश दिले आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Navi Mumbai Corona Patient Increase restrictions were extended till 19 July)

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बंधाचे व्यवसायिक आणि नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे अवाहन महानगरपालिकेने केले आहे.

बेलापूर कोरोनाचा हॉटस्पॉट

नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात रुग्ण नियंत्रणात असले तरी सिडको विकसित नोडमध्ये नवीन रुग्णांची वाढ होत आहे. सीबीडी बेलापूर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. नेरुळ, कोपरखैरणे, वाशी परिसरातही प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने शहरातील पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या प्रमाणावर आधारित विविध आर्थिक आणि सामाजिक अॅक्टीव्हिटीज विचारात घेऊन 5 स्तर जाहीर केले आहेत.

निर्बंध 19 जुलैपर्यंत वाढविले

नवी मुंबई महानगरपालिकेचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होत आहे. यामुळे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी आदेश काढून निर्बंध 19 जुलैपर्यंत वाढविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेले नियम यापुढेही लागू होणार आहे. निर्धारीत वेळेतच व्यवसायिकांनी दुकाने सुरु ठेवावी. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नवी मुंबईमध्ये 100 रुग्ण वाढले

नवी मुंबई शहरात शनिवारी 200 रुग्ण वाढले असून 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत कोरोना मृतांचा आकडा 1782 झाला आहे. तर शहरातील 466 रुग्ण घरामध्येच उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्यांपैकी 101 जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

(Navi Mumbai Corona Patient Increase restrictions were extended till 19 July)

संबंधित बातम्या : 

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड

पंतप्रधान आवास बांधकामामुळे एपीएमसी मार्केट परिसरात मोठी वाहतूक कोंडी, मुंबई APMC पाठोपाठ व्यापाऱ्यांची कोर्टात धाव

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.