नवी मुंबई मार्केट परिसरात झुंबड गर्दी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर अॅक्शन मोडमध्ये
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याशिवाय, नवी मुंबईत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे (Navi Mumbai Crowd In Market).
नवी मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याशिवाय, नवी मुंबईत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे (Navi Mumbai Crowd In Market). रुग्ण संख्येने सव्वाशेचा आकडा ओलांडल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे पालिकेची कोव्हिड केंद्रं पुन्हा कामाला लागली आहेत. तर रुग्णांना त्वरित सेवा मिळावी याकरिता तुर्भे येथील बंद केलेले दोन उपचार केंद्र राखीव असून सर्वच बेड तयार करण्यात आले आहेत (Navi Mumbai Crowd In Market).
शिवाय, कोरोना काळात सेवा पुरवणाऱ्या शासकीय आणि खासगी रुग्णालये तयारीला लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रभाव कोरोनाशी लढ्यासाठी पालिका प्रशासन पुन्हा सज्ज झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
एपीएमसी मार्केटमधील गर्दीचे काय?
नवी मुंबईतील विविध शहरात महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. परंतू एपीएमसी मार्केट परिसरात मात्र अद्याप नागरिक सजग नसल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकी पासून माथाडी भवन परिसरापर्यंत अनाधिकृत व्यापारी बसून व्यापार करत आहेत. शिवाय, रस्त्यावर वाहनांना देखील जाण्यास जागा राहिलेली नाही.
या ठिकाणी खरेदीसाठी नियमित झुंबड उडत असून प्रचंड गर्दी येथे केली जात आहे. त्यामुळे रुग्ण वाढीस वाव मिळत असून पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. तुर्भे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने येथे दररोज हा व्यापार राजरोजसपणे चालतो. त्यामुळे या गर्दीवर अकुंश नाही ठेवल्यास रुग्ण संख्या झपाट्याने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे (Navi Mumbai Crowd In Market).
महापालिका लागली कामाला
रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने शहरातील अनेक कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या माध्यमातून चौदा कोव्हिड सेंटर सुरु होती. त्यापैकी बारा केंद्रं बंद करण्यात आली आहेत. परंतू, पुन्हा महापालिका कामाला लागली असून गरज भासल्यास टप्याटप्प्याने उपचार केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानुसार, संबंधित जागेच्या साफसफाईसह इतर आवश्यक कामे केली जात आहेत. औषधे आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरु झाले आहे. रुग्णवाढीचा वेग वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझर्स आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.
हिंगोलीत कोरोना वाढला, 7 मार्चपर्यंत कडक संचारबंदी; मंदिरं, शाळा बंदhttps://t.co/fx0aq56GT5#corona |#CoronaVaccine | #coronavirus | #CoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
Navi Mumbai Crowd In Market
संबंधित बातम्या :
सावधान ! कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा, पण जरा जपूनच, बँक खाते होऊ शकते रिकामी
Maharashtra Washim Corona Update: कोरोनाचा विळखा वाढला,पोहरादेवीमध्ये 21 तर वाशिमध्ये 187 नवे रुग्ण