Navi Mumbai Karona Update : नवी मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 2151 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा उद्रेक झाला आहे. मुंबईसह नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईत गुरुवारी तब्बल 2151 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

नवी मुंबई : राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा उद्रेक झाला आहे. मुंबईसह नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईत गुरुवारी तब्बल 2151 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील एकूण कोरोनाबाधिताचा आकडा आता 116968 वर पोहोचला आहे. यातील 108238 एवढ्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1972 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या स्थितीमध्ये शहरात एकूण 6758 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यात प्रतिबंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
कोरोना नियमांचे उल्लंघन
राज्यात पुन्हा एकदा सक्रीय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतून येत आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक तसेच व्यापारी सरार्सपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. गर्दी कायम असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहेत. तसेच खरेदीसाठी येणारे अनेक ग्राहक मास्कचा देखील वापर करत नाहीत. यामुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
दरम्यान नवी मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कोरोनाबाधितांसाठी 1500 बेड आरक्षीत करण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी टास्क फोर्सची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Explained | लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध! म्हणजे नेमकं सरकार काय करणार आहे? समजून घ्या!
Special Report| कोरोनाचा धोका वाढला, रेल्वे, मॉल आणि रेस्टॉरंट यांचं नेमकं काय होणार?