Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस सज्ज, कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आयुक्तांचं आवाहन

कोव्हिड 19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाच्या कोव्हिड सुरक्षा नियमावलीनुसार काटेकोरपणे साजरा व्हावा, यासाठी नवी मुंबई मनपा सज्ज झालीय. कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेत.

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस सज्ज, कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आयुक्तांचं आवाहन
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 4:30 PM

नवी मुंबई : कोव्हिड 19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाच्या कोव्हिड सुरक्षा नियमावलीनुसार काटेकोरपणे साजरा व्हावा, यासाठी नवी मुंबई मनपा सज्ज झालीय. कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेत. ते श्रीगणेशोत्सव 2021 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत बोलत होते.

शासनाच्या परिपत्रकामध्ये श्रीगणेमूर्तींची उंची सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट आणि घरगुती उत्सवासाठी 2 फूटांपर्यंत निश्चित करण्यात आलीय. त्याविषयी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, नागरिकांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. मूर्तीकारांनाही त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या अनुषंगाने पुन्हा एकवार सर्व मंडळे आणि मूर्तीकारांना माहिती देण्यात यावी, असे आयुक्तांनी निर्देशित केले आहेत.

गणपती मंडळांना परवानगीची प्रत मंडपात दिसेल अशा ठिकाणी लावावी लागणार

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप उभारणी करण्यासाठी मंडळांना आवश्यक परवानगी मिळणे सोयीचे जावे याकरिता 24 जुलैपासूनच www.rtsnmmconline.com या वेबपोर्टलवर विशेष सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. त्यामध्ये अखेरच्या 31 ऑगस्ट 2021 पर्यंत 133 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 120 मंडळांनी अर्जासह सर्व कागदपत्रे जोडल्यानं त्यांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आलेली आहे. या परवानगीशिवाय कोणीही मंडपाची उभारणी सुरू करू नये असे यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. परवानगीची प्रत मंडपात दिसेल अशा प्रकारे प्रदर्शित करण्याच्या सूचना मंडळांना पुन्हा देण्यात याव्यात, अशी सूचना आयुक्तांनी विभाग अधिकाऱ्यांना केलीय.

प्रत्येक पथकाकडे ठराविक संख्येने मंडळांची पाहणी करण्याची जबाबदारी

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडपांमध्ये गर्दी होणार नाही, थर्मल गन, सॅनिटायझरची व्यवस्था असेल, मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन होईल याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विभाग कार्यालय पातळीवर पथके नेमण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकाकडे ठराविक संख्येने मंडळांची पाहणी करण्याची जबाबदारी निश्चित करून द्यावी, असे आदेश आयुक्तांनी केले आहेत. मागील वर्षी श्रीगणेशोत्सवानंतरच कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती. या बाबीकडे विशेष लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने विभाग कार्यालयांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. याकामी कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही असेही स्पष्ट केले.

नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही गर्दी न करण्याचं आवाहन

श्रीगणेशोत्सवामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवून श्रीगणेशोत्सव आरोग्यत्सव स्वरूपात साजरा करण्याविषयी मंडळांना प्रोत्साहीत करावे व त्यादृष्टीने प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे तसेच मास्कचा वापर अनिवार्य असणे या महत्वाच्या गोष्टी असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे व तशा प्रकारच्या सूचना नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही द्याव्यात असे सूचित केले.

एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांची परवानगी

विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या विसर्जनाचा आढावा घेऊन यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करण्यात आली. आता एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांनी यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यांच्या कामास सुरूवातही झालेली आहे. ही कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीची कामे श्रीगणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण असावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत.

विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स, होर्डिंगवर जाहीर करणार

नागरिकांच्या माहितीसाठी या विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स होर्डिंगवर, सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीसोबत सर्व तलावांत योग्य पातळीपर्यंत पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात दिले. या कृत्रिम तलावांची अखेरच्या विसर्जनदिनानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे आयुक्तांचे निर्देश

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवरही प्रतिवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने त्याठिकाणी स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था, तेथील विद्युतव्यवस्था, सीसीटिव्ही व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निर्माल्याचे ओले व सुके असे वेगवेगळे संकलन करणे, त्याचे पावित्र्य जपत योग्य रितीने विल्हेवाट लावणे तसेच कोणत्याही परिस्थितीत हार व पुजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे व यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

“यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करा”

नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस विभाग नागरिकांना श्रीगणेशोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी सज्ज आहे. तथापि नागरिकांनी सध्याची कोव्हीड 19 परिस्थिती लक्षात घेता आपल्या वर्तनामुळे कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर दिले जात नाही ना? असा प्रश्न स्वत:लाच विचारून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन (covid appropriate behavior) ठेवावे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन व परिमंडळ 1 उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 उपआयुक्त अमरिश पटनिगेरे, शहर अभियंता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पाटील, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, अशोक मढवी, संध्या अंबादे आणि सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता तसेच सहा. पोलीस आयुक्त गजानन राठोड व विनायक वस्त आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

पोटासाठी भारतात, नवी मुंबईत राबणाऱ्या नेपाळी कामगारांसाठी लसीकरण कॅम्पची मागणी

मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये बदामाच्या दरात 250 रुपयांची घसरण; सुकामेव्याचे दर स्थिर

थ्री स्टार हॉटेलमध्ये आठ महिने राहिला, दोन सुपर डीलक्स रुममध्ये ऐशोआरामात वावरला, 25 लाखांचं बिल भरण्याची वेळ येताच…

व्हिडीओ पाहा :

Navi Mumbai Municipal corporation and Police ready for Ganeshotsav

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.