कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा नमुंमपा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून निषेध
या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालवून त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावे. याबाबतचा आग्रह शासनाला कळविण्यात यावा असे लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले.
नवी मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी फेरीवाला विरोधी कारवाई करताना भ्याड हल्ल झाला होता. या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालवून त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावे. याबाबतचा आग्रह शासनाला कळविण्यात यावा असे लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. (Navi Mumbai Municipal Corporation employees demand severe punishment for Kalpita Pimple’s attacker)
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उप आयुक्त जयदीप पवार, मनोजकुमार महाले, श्रीराम पवार, राजेश कानडे, क्रांती पाटील, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त अनंत जाधव, सुबोध ठाणेकर, मंगला माळवे, मिताली संचेती आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे चिंताजनक
एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून अशा घटनांचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपले कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारचा भ्याड हल्ला करतात तेव्हा संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी करीत आपले दैनंदिन कामकाज करताना शासकीय, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्याकरीता आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी या निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation employees demand severe punishment for Kalpita Pimple’s attacker)
धक्कादायक! स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरलेhttps://t.co/wNkEVP71Kv#YouthMurder |#MiraBhayander |#HittingBike |#Scooty
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2021
इतर बातम्या