चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका धावली, 43 जणांचे वैद्यकीय पथक रवाना
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने शनिवारीच महाड भागाकडे रवाना झाले आहेत.
नवी मुंबई : कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अशा संकटसमयी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने शनिवारीच महाड भागाकडे रवाना झाले आहेत. त्यांनी त्याठिकाणी मदतकार्यास सुरूवात केलेली आहे.
मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह रवाना
मदतकार्याची वाढती गरज लक्षात घेऊन माणगांवच्या प्रांत प्रशांती दिघावकर यांच्या विनंतीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने रविवारी स्वच्छता निरीक्षक विजय पडघन आणि उपस्वच्छता निरीक्षक दिपक शिंदे यांच्यासह 20 स्वयंसेवकांचे आणखी एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह महाडच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांनीही तेथे पोहचून लगेच मदत कार्यवाहीस सुरुवात केलेली आहे. या पथकासोबत मिनी ट्रक, मिनी टिप्पर, 4 पाण्याचे टँकर, 2 टन कार्बोलिक पावडर पाठवण्यात आली आहे.
गरजेचे साहित्यही रवाना
तसेच या पथकासमवेत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या सेवाभावी संस्थेने तेथील आप्तग्रस्तांसाठी 7 हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, सतरंजी, ब्लॅंकेट, सॅनिटरी पॅड्स पॅकेट्स यांसारखे साहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच शेल्टर या सेवाभावी संस्थेने 5000 अंघोळीचे साबण असे साहित्य पाठविलेले आहे. कोकणातील अनेक भागांमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. याकरिता तेथील शासकीय विभागांच्या मागणीनुसार आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता केली जात आहे.
मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त, धबधब्यांमधील दगडधोंडे खाचरात https://t.co/hnqI1XYEeh #Rain #Crops #Farmers
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2021
(Navi Mumbai Municipal Corporation first aid 43 people medical team for Chiplun flood victims)
संबंधित बातम्या :
Governor at Taliye | राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर
मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त, धबधब्यांमधील दगडधोंडे खाचरात