थकबाकीदारांनी कराची रक्कम 21 दिवसांच्या आत भरावी, अन्यथा मिळकतींची विक्री होणार, नवी मुंबई महापालिकेचे आदेश
थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याची नोटीस बजावूनही नोटीशीच्या विहीत कालावधीत थकबाकी न भरणाऱ्या 119 मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करीत थकबाकी वसूल करण्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारक यांच्या नावावर असलेले मोकळे भूखंड, मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई : थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याची नोटीस बजावूनही नोटीशीच्या विहीत कालावधीत थकबाकी न भरणाऱ्या 119 मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करीत थकबाकी वसूल करण्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारक यांच्या नावावर असलेले मोकळे भूखंड, मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत.
मिळकतीवरील कराची रक्कम जमा करण्याचे आदेश
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील नियम 45 अन्वये सदर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असून मालमत्ताकर थकबाकीदार कसुरदाराने त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसुलीच्या खर्चासह 21 दिवसाच्या आत महापालिकेकडे जमा केली नाही, तर मिळकतीची विक्री करण्यात येईल. असा हुकुमनामा मालमत्ता कर विभागामार्फत जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान, सदर मिळकतधारक, मालक यांनी सदर मिळकत विक्री ग-गहाण, दान यासह अन्य प्रकारे मालकी हक्कामध्ये बदल करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे हुकुमनाम्यात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.
मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने मालमत्ता कर विषयक बाबींचा नियमित आढावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने घेतला जात असून थकबाकीदारांना ‘अभय योजना’ ची सवलत देऊनही त्याचा लाभ न घेणाऱ्या आणि त्यानंतरही नोटीशीस प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.
एकूण 119 मालमत्तांचा समावेश
मालमत्ता कर थकबाकीदारांना थकबाकीच्या रक्कमेमध्ये 75 टक्के इतकी सवलत देण्याची अभय योजना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. ‘अभय योजना’च्या दोन महिन्यांच्या कालावधीतही योजनेला प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या रक्कमेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस बजावून संधी देण्यात आली होती. तरीही सदर संपूनही नोटीशीला प्रतिसाद विभागातील 19, विभागातील 20, नेरुळ वाशी विभागातील 34, तुर्भे विभागातील 10, कोपरखैरणे विभागातील नोटीशीचा कालावधी न देणाऱ्या 119 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर 17, घणसोली विभागातील 12 आणि ऐरोली विभागातील 7 अशा एकूण 119 मालमत्तांचा समावेश आहे.
सदर 119 मालमत्ताधारकांना रक्कम भरणा करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या कालावधीतही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री केली जाणार आहे याची स्पष्ट सूचना हुकुमनामाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर हुकुमनामा नागरिकांच्या माहितीसाठी नवी मुंबई महापालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात, पात्र अर्जदारांना सिडकोचा दिलासाhttps://t.co/UmWiZCzCl3#Cidco |#Plot |#GeoTagging |#Relief |#Applicants
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
संबंधित बातम्या :
Navi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रो मार्ग-1 वर शनिवारपासून चाचणी होणार