कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी फेरीवाला विरोधी कारवाई करताना भ्याड हल्ला झाला होता. याच्या निषेधार्थ अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालवाला. त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, याबाबतचा आग्रह शासनाला कळविण्यात यावा, असे लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन
Navi Mumbai Municiple Corporation Officials
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 9:14 AM

नवी मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी फेरीवाला विरोधी कारवाई करताना भ्याड हल्ला झाला होता. याच्या निषेधार्थ अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालवाला. त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, याबाबतचा आग्रह शासनाला कळविण्यात यावा, असे लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले.

याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड, उप आयुक्त जयदीप पवार, मनोजकुमार महाले, श्रीराम पवार, राजेश कानडे, क्रांती पाटील, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर आणि परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त अनंत जाधव, सुबोध ठाणेकर, मंगला माळवे, मिताली संचेती आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एका महिला अधिकाऱ्यावर अशाप्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून अशा घटनांचा सर्व स्तरावरुन निषेध होणे आवश्यक आहे. शासकिय, प्रशासकिय अधिकाऱ्यांवर आपले कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारचा भ्याड हल्ला करतात तेव्हा संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी करीत आपले दैनंदिन कामकाज करताना शासकिय, प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्याकरिता आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी या निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे.

कल्पिता पिंपळेंवर हल्ला

फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

राज ठाकरेंकडून कल्पिता पिंपळेंची विचारपूस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

“लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो”, असा शब्द त्यांनी कल्पिता पिंगळे यांना दिला. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असंही राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्या, केडीएमसी अधिकाऱ्यांची मागणी, ठाण्यातील घटनेच्या विरोधात कामबंद आंदोलन

राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.