नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, लवकरच प्रवास सुकर होणार

तळोजा पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क या 5 किलोमीटर अंतरावर शनिवारपासू (28 ऑगस्ट) चाचणी सुरू झालीय. ही चाचणी पुढील 8 दिवस चालणार आहे. मेट्रो सध्यस्थितीत 60 च्या गतीने सुरू आहे. पुढील 10 दिवसात मेट्रो 90 किमी वेगाने चालवण्यासाठी चाचणी होईल.

नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, लवकरच प्रवास सुकर होणार
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 8:10 AM

नवी मुंबई : नवी मुंबईत तळोजा पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क या 5 किलोमीटर अंतरावर शनिवारपासून (28 ऑगस्ट) चाचणी सुरू झालीय. ही चाचणी पुढील 8 दिवस चालणार आहे. मेट्रो सद्यस्थितीत 60 च्या गतीने सुरू आहे. पुढील 10 दिवसात मेट्रो 90 किमी वेगाने चालवण्यासाठी चाचणी होईल. रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरएसडीओ) वतीने ही चाचणी सुरू आहे. यापुढे बेलापूर ते पेंधर एकूण 11 किलोमीटरपर्यंत चाचणी होणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने नवी मुंबईत पेंधर ते बेलापूर या 11 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम 2011 मध्ये सुरू केले. मात्र, अनेक कारणांमुळे हा मार्ग गेली 6 वर्षे रखडला आहे. यापूर्वी गा मार्ग 2015 ला सुरु होईल असे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले होते. हा मार्ग लवकर मार्गी लागावा यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महा मेट्रोवर हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या मार्गाच्या कामाला वेग आल्याने मुख्य वायडक्ट, आगार प्रवेश वायडक्ट, आगार कार्यशाळा उभारणीची कामे पूर्ण झाली. स्थानकांवर जाणाऱ्या लिफ्ट, उद्वाहन, फर्निचर आणि सिग्नलप्रमाणे ही कामे प्रगतिपथावर आहेत.

मेट्रो चाचणी कशी होणार?

तळोजा पेंधर ते सेंट्रल पार्क या 5.14 किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरु असलेल्या चाचणीसाठी रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचे (आरएसडीओ) सह व्यस्थापकीय संचालक अनंत तिवारी आणि त्यांच्या अधिपत्याखाली अरविंद कुमार सिन्हा, राम आशिष सिंग, संजीवकुमार चव्हाण आदित्य गुप्ता आणि पी के सिंग हे 5 अभियंते चाचणी घेत आहेत. पेंधर ते सेंट्रल पार्क या 5 किलोमीटर अंतरावर सध्यस्थितीत 60 च्या वेतीने चाचणी सुरू आहे. ही मेट्रो 90 च्या वेगाने चालेल तोपर्यंत चाचणी सुरु राहणार आहे.

मेट्रोल हिरवा कंदिल कधी मिळणार?

ऑसिलेशन चाचणी व त्याचबरोबर इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी आरएसडीओच्या अधिकाऱ्याच्या समक्ष होत आहे. मेट्रो 90 च्या वेगाने सुरु झाल्यावर रेल्वे रूळ तसेच इतर प्रणालींचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी आरएसडीओकडे असणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर स्थानक खारघर ते बेलापूरपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळणार आहे.

हेही वाचा :

खारघर, तळोजा, कळंबोलीत पाणीटंचाई; सिडकोविरोधात लोकांचे आंदोलन

भाजप नगरसेवकाला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांना अटक आणि जामीनावर सुटका, न्यायालयाबाहेरच सत्कार!

नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचराकुंड्या हटवून वृक्ष सुशोभिकरण

व्हिडीओ पाहा :

Navi Mumbai Pendhar to Kharghar Central park metro route testing started

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.