सिडकोला घेराव घालणाऱ्या आजी माजी आमदार-खासदार-मंत्र्यांसह 18 ते 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Navi Mumbai Police Action taken Against Cidco gherao Agitator)

सिडकोला घेराव घालणाऱ्या आजी माजी आमदार-खासदार-मंत्र्यांसह 18 ते 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल
सिडकोला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत...
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 2:50 PM

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा मोठ्या वादाचा विषय ठरला असून दि. ब. पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे या समर्थनार्थ काल पालघर ते रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात दाखल झाले होते. त्यामुळे या ठिकाणी विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. (Navi Mumbai Police Action taken Against Cidco gherao Agitator over Navi Mumbai International Airport naming DB patil)

4 माजी खासदार, 2 माजी मंत्री, 7 आमदार, 2 माजी आमदार, नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर, पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शिवाय त्यांच्या जवळपास 18 ते 20 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलकांना मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेज वरील सर्व लोकप्रतिनिधी आणि 18 ते 20 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

आजी-माजी खासदार, आमदार मंत्र्यांवर गुन्हे दाखल

कृती समिती अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेचे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, मयुरेश कोटकर यांच्यासह हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

कोणत्या कलमांर्तगत गुन्हे दाखल?

साथीरोग कायदा, सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, जमावबंदी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, ध्वनिप्रदूषण, वनविभाग कायदा, कोविड 2020 कलम 11, मपोका 143, 341, 188, 269, 270, मपोका अधिनियम 1951 कलम 37, 13 135, 115, 117 या कायदाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(Navi Mumbai Police Action taken Against Cidco gherao Agitator over Navi Mumbai International Airport naming DB patil)

हे ही वाचा :

Navi Mumbai Airport : एक विमानतळ, चार नावांची चर्चा, कोण होते दि बा पाटील?

‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’, तांडेल मैदानात गर्दी जमायला सुरुवात, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Photo : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला, भूमिपुत्रांचं सिडको घेराव आंदोलन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.