इथे भामटे लस न घेताच लसीकरण प्रमाणपत्र देत होते, पोलिसांनी घडवली अद्दल

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या टोळीचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे.

इथे भामटे लस न घेताच लसीकरण प्रमाणपत्र देत होते, पोलिसांनी घडवली अद्दल
Vaccination
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 6:52 PM

नवी मुंबई : करोनापासून बचावासाठी लसीकरण गरजेचं आहे. लोकल ट्रेन , मॉलसह अनेक ठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेले असणं अनिवार्य करण्यात आलंय. लसीकरण बंधनकारक असलं तरी प्रमाणपत्र दाखवण आवश्यक आहे. परंतु अनेक जण लस घेण्यास तयार नसतात. लस न घेताच प्रमाणपत्र घेण्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधून समोर आला आहे. एपीएमसी पोलिसांनी बोगस प्रमाणपत्र तिघांना गजाआड केली आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तिघांना बेड्या, दोघे महापालिकेतील कर्मचारी

एपीएमसी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक मुंबई, ठाणे, आणि उपनगरमधून ट्रेन आणि बसेसमध्ये प्रवेश करतात त्यासाठी त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य होते. एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या टोळीचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे. त्यांच्याकडून सात बोगस प्रमाणपत्र जप्त केली गेली आहेत. नितीन आंनदराव शिंदे याचे एपीएमसी मसाला मार्केट मध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहेत. विराज वाक्षे आणि अमोल झेंडे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. हे तिघे पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून बोगस प्रमाणपत्र तयार करत होते आणि हे प्रमाणपत्रक 3 हजार रुपयाला विकत होते.

दोन आरोपी महापालिकेचे कर्मचारी

त्यापैकी अमोल हा सध्या तुर्भे आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्रावर डेटा इंट्रीचे काम करत होता. नितीनच्या ऑनलाइन सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रे आणि स्मार्ट कार्ड आढळून आली आहेत. ही प्रमाणपत्रे ठाणे , कल्याण, डोंबिवली भागातील रहिवाशांची असल्याचे समजते, एपीएमसी परिसरातील व्यक्तीला प्रमाणपत्रे दिली जात होती. मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हा प्रकार उघड झाला.

Pimpri -Chinchwad| स्पा सेंटरमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.