दागिने, वस्तू, ऑटो रिक्षा, कार, नवी मुंबई पोलिसांनी चोरी गेलेल्या 1 कोटी रुपयांच्या नागरिकांना परत केल्या
नवी मुंबई पोलिसांतर्फे नवी मुंबईतील नागरिकांना जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 1 वाशी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम वाशी साहित्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमात जवळपास 50 लोकांना दागिने, वस्तू, ऑटो रिक्षा, कार आणि कॅमेरे अशा वस्तू परत करण्यात आल्या. चोरी आणि दरोडे प्रकरणात तक्रार असलेल्या नागरिकांना हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांतर्फे नवी मुंबईतील नागरिकांना जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 1 वाशी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम वाशी साहित्य मंदिर येथे पार पडला.
या कार्यक्रमात जवळपास 50 लोकांना दागिने, वस्तू, ऑटो रिक्षा, कार आणि कॅमेरे अशा वस्तू परत करण्यात आल्या. चोरी आणि दरोडे प्रकरणात तक्रार असलेल्या नागरिकांना हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.
अशा गुन्ह्यांमध्ये 40 ते 50 टक्के मुद्देमाल हस्तगत होता. गुन्हेगारांच्या अटकेपासून ते मुद्देमाल हस्तगत करणे ही सोपी प्रक्रिया नाही. तरी पोलीस 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्याचा प्रयत्न करतात. तरी पोलिसांनी केलेल्या कामाचे आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच लोकांनी अधिक काळजी घ्यावी अशी विनंतीही केली आहे. तसेच, अशा घटना घडल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर पोलिसांनी चोरीला गेलेले 116 मोबाईल परत मिळवले
काही दिवसांपूर्वी नागपूरसह परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरीला गेलेले हे मोबाईल शोधण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले 116 मोबाईल परत मिळवले आहेत. 36 लाख रुपये किंमतीचे हे 116 मोबाईल लोकांना परत करण्यात आले. नागपूर पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत हे 116 मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले.
जमिनीच्या हरकतीचा अहवाल देण्यासाठी एक लाखांच्या लाचेची मागणी, तहसीलदाराला रंगेहाथ अटकhttps://t.co/tFNuXelzPp#NaviMumbai #Bribe #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या :
नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, लवकरच प्रवास सुकर होणार
बनावट नावे, बोगस ओटीपी, नेरुळमध्ये कोविशील्ड लसीचा काळाबाजार, 60 हजारांच्या व्हाईल्स जप्त