Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, मोरबे धरण 100 टक्के भरले!

मोरबे धरणात आजच्या घडीला 190890 दशलक्ष घनमीटर म्हणजे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागात मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, मोरबे धरण 100 टक्के भरले!
मोरबे धरण 100 टक्के भरले!
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 8:25 PM

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे चौक येथील मोरबे धरण हे 100 टक्के भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. गेले काही दिवस सतत पडणाऱ्या दमदार पावसामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण 23 सप्टेंबर रोजीच पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Navi Mumbai residents water problem solved, Morbe dam 100 percent full)

मोरबे धरण 100 टक्के भरले

मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नवी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या वर्षी धरण परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते. मात्र यंदा पावसाने गेल्या काही दिवसात जोरदार हजेरी लावल्यामुळे अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले. हा पाणीसाठा 26 सप्टेंबर 2022 पर्यंत पुरणार आहे. मोरबे धरणात आजच्या घडीला 190890 दशलक्ष घनमीटर म्हणजे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागात मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई आणि परिसरासाठी दिवसाला 470 एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. 2017 ते 2019 अशी सलग तीन वर्ष पूर्ण क्षमतेने भरणारे हे धरण मागच्या पावसाळ्यात 2020 मध्ये मात्र पूर्ण भरले नव्हते. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी पुरवठ्याची चिंता लागून राहिली होती. आता मात्र धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची ही चिंता मिटली आहे. धरण भरल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आली आहे असे माहिती महापलिकाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनवणे यांनी सांगितले. (Navi Mumbai residents water problem solved, Morbe dam 100 percent full)

इतर बातम्या

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं, हत्येचा उलगडा होताच खळबळ

Breaking : ईडीकडून अनिल परबांची तब्बल 8 तास चौकशी! तपासाला सहकार्य करणार, परबांची ग्वाही

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.