‘गणेश नाईक म्हणजे बुडतं जहाज, आमचे नगरसेवक त्यांच्याकडे जायचा मूर्खपणा करणार नाहीत’

नवी मुंबईतील भाजपचे दोन आमदार आपापसात बोलत नाहीत. त्यामुळे गणेश नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. | Ganesh Naik

'गणेश नाईक म्हणजे बुडतं जहाज, आमचे नगरसेवक त्यांच्याकडे जायचा मूर्खपणा करणार नाहीत'
गणेश नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांची अवस्था ही बुडत्या जहाजाप्रमाणे झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 8:03 PM

नवी मुंबई: गणेश नाईक हे म्हणजे बुडतं जहाज आहे. बुडणाऱ्या जहाजात कोणी बसतं का?, असा बोचरा सवाल शिवसेना नेते विजय नाहटा यांनी उपस्थित केला. गणेश नाईक (Ganesh Naik) यांची सध्याची अवस्था पाहता एखादा माजी नगरसेवकही त्यांच्या गोटात जायचा विचार करणार नाही, अशी टीका नाहटा यांनी केली. (Shivsena leader attack on BJP Ganesh Naik)

ते मंगळवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नवी मुंबईतील भाजपचे दोन आमदार आपापसात बोलत नाहीत. त्यामुळे गणेश नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांची अवस्था ही बुडत्या जहाजाप्रमाणे झाली आहे. त्यामुळे आमचा कोणताही नगरसेवक या बुडत्या जहाजात बसण्याचा मूर्खपणा करणार नाही, असे नाहटा यांनी म्हटले. नवी मुंबई महानगरपालिकेचत आगामी महापौर हा महाविकासआघाडीचाच असेल. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे, असेही नाहटा यांनी सांगितले.

जाणाऱ्यांचे देव भले करो

तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडणार त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. त्यामुळे नवी मुंबईतील विशेषतः शिवसेनेचे कुठले नगरसेवक गणेश नाईक यांच्या तंबूत शड्डू ठोकतील याची उत्सुकता नवी मुंबईकरांना लागली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे नवी मुंबईतील नगरसेवक फोडाफोडीला उधाण आले आहे. मागीलवर्षी सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगसेवकांनी नाईक यांची साथ सोडली होती. आतापर्यत १४ नगरसेवक नाईक यांची साथ सोडून विरोधकांकडे डेरे दाखल झाले आहेत. यावर नाईक याना विचारले असता १९९७ पासून अनेक नगसेवक आमची साथ सोडून जात आहेत. तरी देखील नवी मुंबईकरांनी सत्तेचे दान आमच्याच पारड्यात टाकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो अथवा कोणतीही मोठी आघाडी असो महापौर आमचाच होणार, असा दावा त्यांनी केला आहे. तर जाणाऱ्यांचे देव भले करो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

तुम्ही दोन नगरसेवक फोडले त आम्ही चार फोडू

तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार फोडू, चार फोडले तर आठ फोडू, तुम्ही जितके फोडला त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू आणि मी एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती केल्याशिवाय राहत नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आजमितीला नवी मुंबईत शिवसेनेचे सर्वाधिक माजी नगरसेवक हे गणेश नाईक यांचे शिष्य राहिले आहेत. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या द्रोणाचार्याला कुठले एकलव्य पुन्हा एकदा गुरूदक्षिणा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार? अशी चर्चा सध्या नवी मुंबईत रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोळंबा होणार?

गुटखा किंग राजन गुप्ताला अटक, शिवसेना पदाधिकारी असल्यानं खळबळ

गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’; शिवसेनेची जळजळीत टीका

(Shivsena leader attack on BJP Ganesh Naik)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.