Coronavirus | नवी मुंबईकरांना मोठा दिलासा, शहरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही

मुंबईच्या प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Coronavirus | नवी मुंबईकरांना मोठा दिलासा, शहरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही
नवी मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 2:40 PM

नवी मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचे काही संशयित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सुदैवाने मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (No Patient Found in Mumbai Navi Mumbai Delta Plus Variant patient)

मुंबईत एकही रुग्ण नाही

मुंबईत सध्या डेल्टाचा एकही रुग्ण नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत दोन जणांना कोरोनाच्या डेल्टा प्ल्स व्हेरियंटचे नवे रुग्ण समोर आले होते. यातील एक रुग्ण मुंबईत आणि एक रुग्ण ठाण्यातील होता. त्याचे नमुने मुंबईत झाले होते. मात्र आता हे दोन्ही बरे झाले आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने डेल्टा विषाणूबाबत सर्व तयारी करुन ठेवली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाचा दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचे काही संशयित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.मुंबईच्या प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

नवी मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंट नाही

कोरोना संसर्गाचा दुसरी लाट आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिंटचे काही संशयित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई येथून घेतलेल्या नमुन्यांमध्ये संशयित सार्स-सीओव्ही-2 डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. पण सुदैवाने अद्याप नवी मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आलेला नाही याची खातरजमा करण्यात आली आहे.

सध्या नवी मुंबईत कुठलाही रुग्ण मनपा क्षेत्रात नाही. तसेच रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. कोरोनाच्या तिसरा लाटेचा विचार करता योग्य ती खबरदारी घेऊ. तसेच याबाबत योग्य ते नियोजन करुन डेल्टा प्लस वेरीयंटबाबत माहिती घेऊ, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 34 रुग्ण तर देशाची संख्या 66 वर

पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी 14 नव्या केसेस सापडल्या आहेत. डेल्टा प्लसने आतापर्यंत 34 रूग्ण संक्रमित झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत. अशाप्रकारे, देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांती संख्या 66 झाली आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

(No Patient Found in Mumbai Navi Mumbai Delta Plus Variant patient)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 34 रुग्ण, कर्नाटक सरकार ॲलर्ट, सीमेवर निर्बंध वाढवले

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.