नवी मुंबईत ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे मनाई आदेशाचा भंग, चित्रा वाघ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी 'भाजपा'च्या वतीने 26 जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते.
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चे निदर्शने, धरणे, बंद पुकारणे या प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 26 जूनला वाशीमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. पण या मनाई आदेशाचा भंग केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘भाजपा’च्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (OBC Reservation protest in navi mumbai FIR Register against Chitra Wagh and other BJP official)
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी ‘भाजपा’च्या वतीने 26 जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वाशीतील शिवाजी चौकामध्ये ‘भाजपा’च्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिवाजी चौकाच्या मधोमध ठिय्या मांडून वाहतूक रोखून चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे शिवाजी चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाशी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले होते.
आजच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरतजी आ.रमेशजी मा.खा.संजीवजी नाईक सतिशजी निकम सुतारजी दशरथजी सर्व नगरसेवक नगरसेविका महिला युवा ओबीसी मोर्चा व सगळे मान्यवर पदाधिकारी तसेच ओबीसी समाजबांधव सहभागी झाले (२/२) pic.twitter.com/N9kAm3czti
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 26, 2021
भाजपकडून शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळे एकत्र येऊन मोर्चे निदर्शने, धरणे, बंद पुकारणे या प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मात्र त्यानंतर देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी जमवून वाशीतील शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
यामुळे या आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी चित्रा वाघ यांच्यासह आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक दशरथ भगत, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, निशांत भगत, सतीश निकम, राहुल डहाणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच ‘भाजपा’च्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील 315 दिवसांचं अंतर अधिक प्रभावी, तिसऱ्या डोसने ‘इम्युनिटी’ आणखी वाढणार https://t.co/Wm6DOaecDG #CovishieldVaccine | #astrazenecavaccine | #Covid19 | #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
(OBC Reservation protest in navi mumbai FIR Register against Chitra Wagh and other BJP official)
संबंधित बातम्या :
फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात, OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार
संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता: उद्धव ठाकरे