ONGC Fire : उरणमधील ओएनजीसीच्या प्लांटमध्ये भीषण आग लागल्यानं खळबळ, वेल्डिंग करताना लागली आग
ONGC Plant Fire : वेल्डिंगचं काम करताना ही आग भडकली होती. या आगीच्या दृश्यांवरुन ही आग किती भीषण स्वरुपाची होती, याची कल्पना करता येऊ शकेल.
नवी मुंबई : नवी मुंबईतील उरण (Uran, Navi Mumbai Fire) येथील ओएनजीसीच्या प्लांटमध्ये भीषण आग (Fire in ONGC Plant) लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. मात्र या आगीमुळे हवेत प्रचंड लोळ पसरले होते. आजूबाजूच्या परिसरात या आगीनं एकच खळबळ उडाली होती. ओएनजीच्या या प्लांटमध्ये लागलेली ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आता सुरु करण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी अग्निशमनचे जवान बचावकार्य करत आहेत. या आगीमुळे दूरदूरपर्यंत आगीचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. वेल्डिंगचं काम सुरु (Fire due to Welding Work) असताना ही आग अचानक भडकली. या आगीत मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
ओएनजीसी प्लांटच्या आजूबाजूच्या गावांतूनही या आगीची भीषण दाहकता जाणवत होती. आगीचे लोळ दूरवरुन पाहिले गेले आहे. अनेकांची आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात आगीची ही घटना रेकॉर्ड केली आहे.
पाहा व्हिडीओ :
ONGCच्या प्लांटमध्ये भीषण आग आगीमुळे परिसरात धुराचे लोट#ONGC #Fire #NaviMumbai #Maharashtra
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/B8aoOLjRLL
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2022
धोका टळला!
वेल्डिंगचं काम करताना ही आग भडकली होती. आगीच्या दृश्यांवरुन ही आग किती भीषण स्वरुपाची होती, याची कल्पना करता येऊ शकेल. ONGC प्लांटमध्ये लागलेल्या या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली असल्याची माहिती मिळतेय. तीन वर्षांपूर्वी ओएनजीसी प्लांटमध्ये गॅस गळती झाली होती. या गॅस गळतीमुळे प्लांट रिकामा करण्याची वेळ ओढावली होती. 25 सप्टेंबर 2019 रोजी ही गॅस गळती झाली होती. या गॅस गळतीनंतर आता आज लागलेल्या भीषण आगीनं पुन्हा एकदा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना धडकी भरवली होती. या आगीनंतर आजूबाजूच्या परिसरातही खळबळ झाली होती.
सुदैवानं ही आग आता नियंत्रणात आली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान झालेलं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. याबाबत नेमकी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नसली, तर आग नियंत्रणात आल्यामुळे ओएनजीसी प्लांटमधील कर्मचाऱ्यांसोबत आजूबाजूच्या लोकांच्याही जीवात जीव आला आहे.