पनवेल मनपा क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शक्कल
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची आणि विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाहणी केली.
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोर ओशन सोल्युशनस यांच्या प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा pmc.visarjanslots.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. (Online timeslot booking for immersion of Ganesh idol in Panvel Municipal Corporation area)
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची आणि विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
60 ठिकाणी गणेश विसर्जन उपलब्ध
सन 2021 च्या गणेश विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एकूण 60 ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी त्यांच्या घराजवळचे मूर्ती विसर्जन स्थान व वेळ निश्चित करावी. ही सुविधा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक विसर्जन दिवशी दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यत प्रत्येक विसर्जन स्थळी 30 मिनिटांचे 20 विसर्जन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
निश्चित वेळेच्या 30 मिनिटे आधी विसर्जन केंद्रावर उपस्थित रहावे
संबंधित नागरिकाने निश्चित करण्यात आलेल्या कालावधीच्या 30 मिनिटे आधी विसर्जन केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. विसर्जन कालावधी यशस्वीरित्या निश्चित केल्यानंतर संबंधित नागरिकाला युनिक सिरीयल नंबर, ठिकाण आणि विसर्जन कालावधीची वेळ इत्यादी माहिती पाहता येईल. संबंधित नागरिकाने ही रिसीट डाउनलोड करावी. सदर रिसीट विसर्जन केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दाखवणे आवश्यक आहे. अर्जदाराला युनिक सिरीयल नंबर, ठिकाण आणि विसर्जन कालावधीची वेळ SMS द्वारेही प्राप्त होईल. नागरिकांना विनंती आहे की सदर SMS त्यांच्या नियोजित गणेश विसर्जन दिवसापर्यंत जतन करावा.
प्रत्येक गणेशमूर्तीसोबत जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी
नागरिकांनी आपला विसर्जन कालावधी काळजीपूर्वक निश्चित करावा. निश्चित करण्यात आलेला कालावधीत बदल अथवा रद्द करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक गणेशमूर्ती समवेत जास्तीत जास्त तीन लोक असावीत. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती गणपतीकरीता 2 फूटांच्या मर्यादेत असावी. विसर्जन स्थळी श्रींची आरती करण्यास सक्त मनाई आहे.
सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक
कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क घालणे, बंधनकारकआहे. विसर्जनाच्या वेळी एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे. तसेच सतत आपल्या सोबत सॅनिटायझर असावे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. कधी कधी एकाच वेळी अनेक नागरिक या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. त्यामुळे संकेतस्थळावर ताण येऊन संकेतस्थळाची गती मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
एका मोबाईलवरुन एकच नोंदणी करता येणार
एका मोबाईल क्रमांकावरून फक्त एक नोंदणी करता येईल. आपल्याला आणखी एखादा विसर्जन कालावधी निश्चित करायचा असल्यास दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल. पनवेल महानगरपालिका आणि शासनाच्या वतीने वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले नियम, अटी, मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणे सर्व नागरिकांसाठी बंधनकारक आहे. (Online timeslot booking for immersion of Ganesh idol in Panvel Municipal Corporation area)
50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स#Vivo #Smartphonehttps://t.co/4qA1L3HpKe
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
इतर बातम्या
चावून खायचं की तसच गिळायचं? तुळशीच्या पानाचं नेमकं काय करायचं? वाचा सविस्तर
Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद