कोरोनामुळे आगळा वेगळा फ्रेंडशिप डे; पुढील मैत्रीदिनापर्यंत 5 मित्र 25,000 झाडं लावणार

मित्रांना भेटता येत नसले म्हणून काय झाले पनवेलमधील काही मित्रांनी डिजिटल फ्रेंडशिप डे साजरा केला. त्या 6 ते 7 मित्रांनी व्हिडिओ कॉलवर एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

कोरोनामुळे आगळा वेगळा फ्रेंडशिप डे; पुढील मैत्रीदिनापर्यंत 5 मित्र 25,000 झाडं लावणार
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 6:07 AM

पनवेल : दिल, दोस्ती आणि दुनियादारीचे स्वरूप आता मात्र बदललेलं पाहायला मिळतंय. आजवरचे सर्व Friendahip Day लय भारी आन भन्नाट असायचे. अख्खा दिवस मित्रमैत्रिणींची धमाल, पेन आणि रिबीनने दिवस रंगलेला असायचा. आता मात्र दिल दोस्ती दुनियादारी तिच आहे, फक्त प्रत्यक्ष भेटींऐवजी ऑनलाईन दोस्ताना रंगत चाललाय एवढंच.

या कोरोनाने आख्ख जग बदलून टाकले आहे. लॉकडाउनच्या आधी फ्रेंडशिप डेला नेमकं काय करायचं? पिकनिकला कुठे जायचं? कुठल्या रंगाचा ड्रेस घालायचा इथपासून सर्व सुरू असायचं. फ्रेंडशिप डेच्या 15 दिवस आधीच दुकानांमध्ये फ्रेंडशिप बँडपासून ते आकर्षक गिफ्ट उपलब्ध असायचे. आता या करूणा काळात कसला फ्रेंडशिप बँड आणि कसलं ते गिफ्ट! परंतु यंदा दुकानाला टाळ आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. अपेक्षित जल्लोष यापासून मुकलेल्या तरूणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुढल्या फ्रेंडशिप डे पर्यंत 25 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प

दुसरीकडे काहींनी यावर सुद्धा शक्कल लढवली आणि डिजिटल तसेच व्हर्चुअल फ्रेंडशिप डे साजरा केला. मित्रांना भेटता येत नसले म्हणून काय झाले पनवेलमधील काही मित्रांनी डिजिटल फ्रेंडशिप डे साजरा केला. त्या 6 ते 7 मित्रांनी व्हिडिओ कॉलवर एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मात्र सेलिब्रेशन करता आले नाही म्हणून नाराज न होता त्यांनी फ्रेंडशिप डे दिवशी एक नवा संकल्प सुद्धा केला. पनवेलचा अभिजीत पाटील याने आणि आमचा असा हा डिजिटल #friendshipday2021 साजरा म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली.

“फक्त झाडांचे वृक्षरोपण नाही, तर संगोपन सुध्दा करणार”

या उपक्रमाविषयी या मित्रांपैकी एक अभिजीत पाटील म्हणाले, “सर्वांसाठी आजचा दिवस खास आहे कारण आज फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन आहे. या काळात रुग्ण जरी कमी होत असले तरी आम्ही मात्र काळजी घेत आजचा हा फ्रेंडशिप डे डिजिटल पद्धतीने साजरा केला. मात्र, या फ्रेंडशिप दिनी आम्ही सर्व मित्रांनी एक संकल्प केलाय. आपण सध्या कोरोना आणि पुराचे थैमान पाहत आहोत. याला सुद्धा आपणच जबाबदार आहोत असं म्हणत पुढल्या फ्रेंडशिप डे येई पर्यंत वर्ष भराच्या काळात पर्यावरणाचा विचार करता 25 हजार झाडे लावूया. फक्त लावुया नाही तर त्यांचे संगोपन सुद्धा करणार आहोत. यात औषधी झाडे, फुले फळांची झाडे तसेच सावली देणारे वड, साग, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर यासारख्या झाड हे सर्व 6 ते 7 मित्र करणार आहोत.”

अभिजित पाटील, सुदाम पाटील, फुलचंद गुप्ता, प्रताप गावंड, नित्यानंद म्हात्रे, दीपक पाटील, धनंजय पाटील अशी या तरुणांची नावे आहेत. यातील अभिजीत पाटील यांनी फेसबूक पोस्ट करत आपली भावना शेअर केली.

Panvel friends decide to plant 25 thousand trees in one year on Friendship Day

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.