पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या अवनी लेखराच्या कोच सुमा शिरुर यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत
पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखरा हिने सुवर्ण कामगिरी करत दोन पदके आपल्या खात्यात जमा केली. मात्र तिच्या यशात तिच्या कोच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमा शिरुर यांचा सिंहाचा वाटा आहे. सुमा या अवनी लेखराच्या खाजगी कोच होत्या. सुमा शिरुर यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील लक्ष्य नेमबाजी क्लबमध्ये विद्यार्थी सुमा शिरूर यांची आतुरतेने वाट पाहत होते.
पनवेल : पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखरा हिने सुवर्ण कामगिरी करत दोन पदके आपल्या खात्यात जमा केली. मात्र तिच्या यशात तिच्या कोच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमा शिरुर यांचा सिंहाचा वाटा आहे. सुमा या अवनी लेखराच्या खाजगी कोच होत्या. सुमा शिरुर यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील लक्ष्य नेमबाजी क्लबमध्ये विद्यार्थी सुमा शिरूर यांची आतुरतेने वाट पाहत होते. सुमा शिरूर यांनी प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी पुष्प वृष्टी करत टाळ्या वाजवत सुमा यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली. यावेळी केक कापत मिळालेल्या यशाचे थ्री चिअर्स करत सेलिब्रेशन करण्यात आले. सुमा शिरुर 4 महिन्यापेक्षा अधिक कालावधीनंतर पनवेलमध्ये आल्या.
पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखरा हिने सुवर्ण कामगिरी करत दोन पदके आपल्या खात्यात जमा केले. सर्व भारतीय तिच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. मात्र, तिच्या यशात तिचे कोच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमा शिरूर यांचा सिंहाचा वाटा आहे. खेळाच्या सुरुवातीला अवनी अचूक नेम धरता येईल का याबाबत चिंतेत होती. मात्र सुमा शिरूर यांनी अवनिला आपण आता पर्यंत केलेल्या कष्टाचे चीज करण्याची हीच संधी आहे आणि या संधीचे सोने तू करु शकतेस असं म्हणत तिच्या मनातली भिती काढली आणि अवनी खेळाकडे वळली.
सुमा शिरूर यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत
पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील लक्ष्य नेमबाजी क्लबमध्ये विद्यार्थी सुमा शिरूर यांची आतुरतेने वाट पाहत होते. सुमा शिरूर यांनी प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी पुष्प वृष्टी करत टाळ्या वाजवत सुमा यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली. यावेळी केक कापत मिळालेल्या यशाचे थ्री चिअर्स करत सेलिब्रेशन करण्यात आले.
सुमा शिरुर 4 महिन्याच्या अधिक कालावधी नंतर त्या पनवेल मध्ये आल्या. सुरवातीला त्या इंडीयन टीम सोबत क्रोयेशिया ला तब्बल 70 दिवस होत्या. तेथून ते थेट टोकिया ऑलिम्पिकसाठी टीम कोच म्हणून रवाना झाल्या होत्या. 15 दिवस टीमसोबत ते त्यांचा मनोबल वाढवत होत्या आणि त्यानंतर आठवड्या भरासाठी मुंबईत दाखल झाल्या. मात्र लगेच नॅशनल ड्युटी पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी त्या दिल्लीत अवनीला प्रशिक्षण देत होत्या आणि पुन्हा एकदा 24 ऑगस्ट रोजी त्या पुन्हा पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी टीम सह गेल्या होत्या. परालॉम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या होत्या. स्पेशल अवनीसाठीच त्यांना पाठवले गेले होते.
आगामी काळात होणाऱ्या आय एस एस एफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन 5 खेळाडू जाणार आहेत. तर दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर 50 ते 60 नेमबाज खेळाडू लक्ष्य क्लबच्या माध्यमातून जात असतात. लक्ष्य क्लबचे हृदय हजारिका – ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन गोल्ड मेडल 2018 , शाहू माने – युथ ऑलिम्पिक सिल्वर मेडल 2018 , जिना खीट्टा – राष्ट्रीय नॅशनल चॅम्पियन गोल्ड मेडल 2019 या खेळाडूंनी नुकतेच नेमबाजीत यश मिळवले आहे.
Tokyo Paralympics : भारताची पदकांची लयलूट, नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेकीत रौप्य, भालाफेकीतही दोन पदकं!https://t.co/dLwZpGoGex #AvaniLekhara | #yogeshkathuniya | #DevendraJhajharia | #SundarSinghGurjar
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
संबंधित बातम्या :
Tokyo Paralympics 2020 : भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन केलं कौतुक
Tokyo Paralympics 2020: भारताच्या अवनी लेखराकडून आणखी एका पदकाचा वेध, नेमबाजीत रौप्यपदक