Bike Theft : ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या गाड्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद
ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या केटीएम कंपनीच्या बाईक हे चोरटे हेरायचे. त्यानंतर बनावट नंबरवरुन त्या गाडीच्या मालकाशी संपर्क करायचे. गाड्या पाहून विकत घेण्याची तयारी दर्शवायचे. त्यानंतर एक राऊंड मारून येतो असे सांगत गाडी घेऊन पलायन करायचे.
नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या गाड्यांची चोरी (Theft) करुन पलायन करणाऱ्या दोन चोरट्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून 5 केटीएम गाड्या जप्त केल्या आहेत. हे दोन्ही चोरटे मूळचे आसामचे रहिवासी आहेत. गाडी विकत घेण्याची तयारी दर्शवत राऊंड मारण्याच्या बहाण्याने गाडी घेऊन पसार व्हायचे. नेरूळ व खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन केटीएम चोरीचे गुन्हे घडल्याने या गुन्ह्यात साम्य असावे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता आरोपींना अटक केले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
राऊंड मारुन येतो सांगून गाडी घेऊन पसार व्हायचे
ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या केटीएम कंपनीच्या बाईक हे चोरटे हेरायचे. त्यानंतर बनावट नंबरवरुन त्या गाडीच्या मालकाशी संपर्क करायचे. गाड्या पाहून विकत घेण्याची तयारी दर्शवायचे. त्यानंतर एक राऊंड मारून येतो असे सांगत गाडी घेऊन पलायन करायचे. गाडीची चोरी केल्यानंतर आरोपी नंबर प्लेट बदलून स्वतःकडे असलेली नंबर प्लेट लावीत असत. तसेच त्यांच्याकडे आरसी बुक देखील असल्याने या आरोपींवर कोणीही संशय घेत नव्हते. नेरूळ व खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन केटीएम चोरीचे गुन्हे घडले होते. या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना ओएसएक्सवरील गुन्ह्यात आणि यात साम्य वाटले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता आसाममधील दोन तरुणांना या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच केटीएम गाड्या जप्त केल्याचे गुन्हे शाखा उपयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. (Police have arrested two thieves for stealing vehicles for sale on OLX)