पनवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे रास्तारोको आंदोलन, आंदोलक ताब्यात

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोकण विभाग आणि रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटना यांच्या वतीने पनवेलमध्ये रास्तारोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली (Rastaroko Amdolan Of Akhil Bhartiya Samata Parishad Panvel For OBC Reservation).

पनवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे रास्तारोको आंदोलन, आंदोलक ताब्यात
Navi Mumbai Protest
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 9:18 AM

नवी मुंबई : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोकण विभाग आणि रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटना यांच्या वतीने पनवेलमध्ये रास्तारोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली (Rastaroko Amdolan Of Akhil Bhartiya Samata Parishad Panvel For OBC Reservation).

यावेळी सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली मॅकडॉनलजवळ कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रस्ता अडवण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘एकच चळवळ छगन भुजबळ- छगन भुजबळ’, ‘उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो’ अशा विविध घोषणा देत समता परिषदेचे पन्नास ते शंभर कार्यकर्त यावेळी रस्त्यावर उतरले होते.

कळंबोली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.ओबीसींच्या बचावा समर्थनार्थ तसेच ओबीसींच्या जनगणने संदर्भातील इम्पेरियल डेटा केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असल्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे बाळू भुजबळ यांनी सांगितले.

राजकीय सरकारमधील ओबीसींचे आरक्षण पुर्ततेअभावी कमी करून स्थगित करण्यात आले आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत इम्पेरिअल डेटा उपलब्ध करुन देण्याबाबत सुप्रीम कोर्टानेही निर्देश दिले आहेत. हे करीत असताना यासाठी आयोग निर्माण करावा त्यानंतर एससी, एनटी नंतर जे उरेल ते आरक्षण दिले जावे तसेच 50 च्यावर जाऊ नये याप्रमाणे तीन अटी घालण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राम पंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद या सर्वांमधील राजकीय क्षेत्रासाठी असणारे ओबीसी आरक्षण जवळजवळ 55 हजार उमेदवारांचे आरक्षण स्थगित झालेले आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या समन्वयाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, असं त्यांनी सांगितलं. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच सुरु राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एकतर निवडणूका पुढे ढकला किंवा आम्हाला केंद्र सरकारकडून डेटा देण्यात यावा. केंद्र सरकार डेटा देत नसेल तर आम्ही डेटा गोळा करतो त्यासाठी आम्हाला मुदत देण्यात यावी अशी सुप्रीम कोर्टाला विनंती केलेली आहे. तसेच या प्रश्नाबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातले असून प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल अशी आशा आहे. परंतु जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील खेडेगावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत असून आमच्या न्याय हक्कांवर कोणी दबाव आणत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असे वक्तव्य बाळू भुजबळ यांनी आंदोलनादरम्यान केले.

Rastaroko Amdolan Of Akhil Bhartiya Samata Parishad Panvel For OBC Reservation

संबंधित बातम्या :

तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके… जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.