गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेची विशेष सेवा
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जर कुठे अडचण अडथळा निर्माण झाला किंवा एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ निश्चिंत होऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत, तुम्हाला कोकणात तुमच्या घरापर्यंत सोडायची जबाबदारी आमची आहे, असं म्हणत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जर कुठे अडचण अडथळा निर्माण झाला किंवा एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ निश्चिंत होऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत, तुम्हाला कोकणात तुमच्या घरापर्यंत सोडायची जबाबदारी आमची आहे, असं म्हणत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी मदतीसाठी मनसेचे अतुल भगत – रायगड, देवेंद्र गायकवाड – महाड, जितेंद्र चव्हाण- रत्नागिरी, धीरज परब – सिंधुदुर्ग या चारही मनसेच्या जिल्हाध्यक्षांचे नंबर सुद्धा प्रसिद्ध केले आहे.
मदतीसाठी नंबर
अतुल भगत – रायगड 9892224372
देवेंद्र गायकवाड – महाड 9423382892
जितेंद्र चव्हाण – रत्नागिरी 9890289114
धीरज परब – सिंधुदुर्ग 9823393927
गौरी गणपतीच्या सणाला चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यात रस्त्यांची काय अवस्था आहे हे तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. त्यांना घरापर्यंत पोहचण्यापर्यंत शासनाने सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. चाकरमानी यांना घरी पोहचण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासन फक्त बोलघेवडेपणा करते, करत काहीच नाही.
RTPCR टेस्ट करणे बंधनकारक नाही?
कोकणात गावी जाताना तुम्हाला टेस्ट करणे बंधनकारक केले होते. मात्र, आता आता गणेशोत्सवासाठी जाताना चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज असणार नाही. हा निर्णय घ्यायला उशीर का केला? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे चाकरमानी पुरते गोंधळले आहेत. अनेकांना याबाबत माहिती सुद्धा नाही. संबधित विभागाने जीआर पोहोचवायला उशीर केला आणि त्यामुळे बऱ्याच चाकरमान्यांना परत पाठवले गेले.
अवजड वाहनांना बंदीसाठी उशीर का?
गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ती बंदी 5 तारखेपासून घालण्यात आली. मात्र, ही बंदी आधी का घातली नाही. बंदी करुन सुद्धा ट्रॅफिक होत आहे. असं म्हणत अतुल भगत यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार कुचकामी आहे. मात्र, आम्ही कोकणवासीयांसाठी तत्पर आहोत. आमची कुठेही मदत लागली तर फक्त एक कॉल करा, आम्ही हजर आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी मनसेचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, संतोष पंडित, अरुण पळसकर , संतोष जाधव, सुशील विश्वास, प्रकाश पाटकर उपस्थित होते.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सुविधा कशी मिळणार? https://t.co/kt8ZFPjWBF @OfficeofUT @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #Ganeshotsav #GaneshChaturthi #TollWaiver #Chakarmani #eknathshinde #MahaVikasAghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
संबंधित बातम्या :
गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या
दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य पथकं तैनात