शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणूक थांबवा, सिफेरर्सकडून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन

शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात.

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणूक थांबवा, सिफेरर्सकडून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन
All India Seafarers Union meet Governor Bhagat Singh
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 3:16 PM

नवी मुंबई : शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात. सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे आमिष देतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तसेच त्यांचे सी. डी. सी आणि पासपोर्टसुद्धा ठेवून घेतात. त्यामुळे तरुणांना इतरत्र नोकरी शोधता येत नाही.

शिपिंग क्षेत्रात नोकरीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची 26 जुलैला राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी राज्यपालांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

संघटनांकडून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न 

बनावट शिपिंग कंपन्या सर्रास मोठमोठ्या शिपिंग कंपन्यांच्या लेटरहेडवर नियुक्तीपत्र, बनावट व्हिसा, फ्लाईट तिकीट आणि इतर कागदपत्र देत आहेत. या क्षेत्रात येणारे सिफेरर्स त्यांना पैसे देतात. बरेच वेळेस हे कायद्याच्या कचाट्यात अडकून देखील यांच्यावर चाप बसत नाही. त्यामुळे अशा बनावट कंपन्यांचे फावत असल्याचे युनियनने राज्यपालांच्या लक्षात आणून दिले. याबाबत आंदोलने आणि कायदेशीर पद्धतीने सदर घटनांना घालून त्या विरोधात लढा दिला. तसेच  कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे संघटनेने राज्यपालांच्या लक्षात आणून दिले.

कंपन्या चालवणारे मास्टर माईंड परराज्यात

अनेकदा प्रशासनाकडून मिळणारी अपुरी मदत आणि सर्रास कंपन्या चालवणारे मास्टर माईंड हे परराज्यात बसून अशा तऱ्हेची फसवी यंत्रणा चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनला देखील मर्यादा पडत आहेत. यावेळी सिफेरर्सच्या लसीकरणात येणाऱ्या समस्या, गोव्याच्या सिफेरर्सचे काही प्रश्न या बाबतीत अनेक विषयांचावर चर्चा करण्यात आली.

(Stop financial fraud in the shipping sector All India Seafarers Union meet Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी

पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना

पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.