नवी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

शहरातील कोरोना लाट सध्या जरी ओसरत असली तरी नवी मुंबई शहरात मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी नवी मुंबईच्या नागरिकांकडून होत आहे.

नवी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ
मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 12:38 PM

नवी मुंबई : शहरातील कोरोना लाट सध्या जरी ओसरत असली तरी नवी मुंबई शहरात मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी नवी मुंबईच्या नागरिकांकडून होत आहे.

गेल्या वर्षी रुग्णांमध्ये घट

गेल्या वर्षी कोरोना आजाराची लाट असताना नवी मुंबईमधील नागरिकांनी आरोग्य विषयक काळजी घेतल्याने मलेरिया आणि डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, आता ‘कोरोना’ची लाट ओसरत असताना पडलेल्या पावसामुळे नवी मुंबईमधील बाजारपेठ, गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

जुलै-2020 च्या अखेरीस नवी मुंबईमध्ये 10 मलेरियाचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 17 रुग्ण आढळले होते. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र, यंदा जुलै 2021 अखेरीस 12 मलेरिया आजाराचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 38 जण आढळले आहेत. त्यातील 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 9 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

एकंदरीत मागील वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील सर्व प्रभागात डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त

नवी मुंबई महापालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी, ऐरोली व नेरूळ रूग्णालयांतील आयसीयू बेड्सची आयुक्तांकडून पाहणी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.