नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरु होणार, 35 ते 40 हजार लोकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला
गेल्या पाच वर्षांपासून काही तांत्रिक कारणामुळे या दगडखाणी बंद होत्या. या दगडखाणी बंद असल्याने 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे दगडखाणी संदर्भात असलेल्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे जवळपास 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. (The state government an important decision to reopen 102 stone quarries in Navi Mumbai)
गेल्या पाच वर्षांपासून दगडखाणी बंद
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून काही तांत्रिक कारणामुळे या दगडखाणी बंद होत्या. या दगडखाणी बंद असल्याने 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
दगडखाणी मालकांशी बैठक
मात्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि प्रकल्पग्रस्त दगडखाणी संदर्भाती अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी दगडखाणी मालकांशी बैठकही केली. या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळेच लवकरच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
नागरिकांना मोठा दिलासा
हा निर्णय घेतल्याने दगडखांणी संदर्भात असलेल्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हे प्रकरण अखेर मार्गी लागले आहे. त्यामुळे सर्वांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
काँग्रेसचा माजी आमदार, शिवसेनेकडून प्रणिती शिंदेंना भिडला, आता ‘घड्याळ’ बांधण्याच्या वाटेवर https://t.co/9lLnFoSb5w #Congress | #NCP | #Solapur | #DilipMane | #Shivsena | #PranitiShinde | @ShivSena | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
(The state government an important decision to reopen 102 stone quarries in Navi Mumbai)
संबंधित बातम्या :
Navi Mumbai Airport : एक विमानतळ, चार नावांची चर्चा, कोण होते दि बा पाटील?
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाला स्वस्त, पण स्थानिक बाजारपेठेतील दर चढेच