Video: तिकिटावरुन झालेल्या वादातून वाहकाला बसमध्येच मारहाण; प्रवाश्यांची बघ्याची भूमिका
बसमध्ये तिकीट देण्यावरून वाहक सूरज भोईर व प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली. अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत वाहकास मारहाण करण्यास सुरुवात केली. बसमधील इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त प्रवाशी वाहकाच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करीत होता.
बेलापूर: बेलापूर-खोपोली (Belapur-Khopoli) मार्गावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसमध्ये तिकीट (Bus Ticket) देण्यावरून एका अज्ञात प्रवासी आणि वाहक सूरज भोईर (Suraj Bhoir) यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. हा वाद झाल्यानंतर सबंधित प्रवाशाने वाहकाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला असून पोलीस या प्रवाशाचा शोध घेत आहेत. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बेलापूर ते खोपोली या 58 नंबरच्या बस वाहकाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मारहाण करून ही व्यक्ती पळून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. संबंधित या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत वाहक सूरज भोईर जखमी झाला आहे.
तिकिटावरुन झालेल्या वादातून वाहकाला बसमध्येच मारहाण#Navimumabi #citybus #crime #Mumbai #belapur pic.twitter.com/CsM4Igtefk
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) May 13, 2022
या बसमध्ये तिकीट देण्यावरून वाहक सूरज भोईर व प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली. अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत वाहकास मारहाण करण्यास सुरुवात केली. बसमधील इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त प्रवाशी वाहकाच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करीत होता.
कर्मचाऱ्यांतून निषेध
तर बसमधील काही प्रवाशी फक्त बघ्याची भूमिकेत होते. बसमध्ये वाहकाला मारहाण करण्यात आल्याने नवी मुंबई परिवहनच्या कर्मचाऱ्यांनीही या मारहाणीचा निषेध नोंदविला आहे.
मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण
यामधील एका प्रवाशाने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बसमधून खाली उतरल्यावरही हा वाद सुरूच होता. यावेळी चालकाने मध्यस्ती करुन त्यांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही वाहकाला मारहाण करण्यात येत होती.
पोलिसांना बघताच धूम
ज्यावेळी त्याला पकडून ठेवण्यात आले होते, त्यावेळी तो उर्मटपणे वाहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. चालकाने त्याला पकडून ठेवण्यात आले होते, त्यावेळी पोलीस येत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्यांने धूम ठोकली.
मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा
वाहकाल मारहाण केल्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना फोन करून पाचारण करण्यात आले. यावेळी या प्रवाशाला पकडून ठेवण्यात आले होते मात्र पोलीस येत असल्याचे समजताच हा प्रवासी पळून गेला. त्याच्याविरोधात 353 अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. ही घटना पनवेलमध्ये घडली असून या घटनेमुळे प्रवाशांमधून आणि कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.