AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान आवास बांधकामामुळे एपीएमसी मार्केट परिसरात मोठी वाहतूक कोंडी, मुंबई APMC पाठोपाठ व्यापाऱ्यांची कोर्टात धाव

Navi Mumbai APMC Market | मार्केट परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो वाहने शेतमाल घेऊन येत असतात. या वाहनांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान आवास बांधकामामुळे एपीएमसी मार्केट परिसरात मोठी वाहतूक कोंडी, मुंबई APMC पाठोपाठ व्यापाऱ्यांची कोर्टात धाव
एपीएमसी मार्केट
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 4:32 PM
Share

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने ग्राहकांसह बाजार घटक हैराण झाला आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केट परिसराला सध्या वाहनांचा विळखा पडला आहे. मसाला मार्केट शेजारील नियोजनबद्ध असलेल्या ट्रक टर्मिनलमधील हजारो वाहने रस्त्यावर पार्क होऊ लागल्याने ही समस्या उद्भवली आहे. मार्केट परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो वाहने शेतमाल घेऊन येत असतात. या वाहनांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Traffic Jam at Navi Mumbai APMC Market)

देशातील विविध ठाकणांहून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल येत असतो. त्यासाठी येणारा शेतमाल खाली करून आणि भरलेल्या शेतमालासाठी सिडकोतर्फे एपीएमसी मार्केट परिसरात जवळपास 10 हजार गाड्या या ठिकाणी एकावेळी पार्क करण्याइतकं मोटं ट्रक टर्मिनल बनवण्यात आलं होतं. मात्र त्यातील निम्म्याहून अधिक जागेत सध्या प्रधानमंत्री आवास योजना सुरु असल्याने या गाड्या सध्या रस्त्यावर पार्क होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दोन लेनमध्ये गाड्या उभ्या केल्या जात आहेत. बाजार समित्यांमध्ये माल घेऊन येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर तासाभराच्या कामासाठी तीन-चार तास वाया घालवाले लागतात. त्यामुळे वाहनांचे चालक-मालक यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्क केलेल्या वाहनांमध्ये कित्येक वाहने जवलनशील पदार्थ घेऊन उभी असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील सरकारने अल्पभूधारक लोकांना घरे देण्याचा निर्णय घेतला होता. यात 1 लाख घरे असल्याने सिडकोने विविध ठिकाणांसह एपीएमसी मार्केटच्या बाजूला असलेल्या ट्रक टर्मिनल जागेवर घरे बांधण्याचा निर्णय घेतला. परंतू हे ट्रक टर्मिनल एपीएमसीत येणारी वाहने पार्क करण्यासाठी केले गेले होते. परंतू त्या ठिकाणी घरकुल योजनेचे काम सुरु केले. त्याच वेळी वाहनांची पर्यायी व्यवस्था मात्र केली नाही. मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बाजार येथे आणला, तर आता येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांकडून सिडको आणि महापालिका पार्किंग चार्ज घेत आहे. सुनियोजित असलेल्या नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे कारभार होत असेल तर तो चुकीचा आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. याबाबत वेळीच नियोजन केले नाही. तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊन बसेल असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. तर याबाबत खासगी पीआयएल दाखल करण्याचा विचार व्यापाऱ्यांचा असल्याचेही ते म्हणाले.

घरकुल योजनेसाठी वापरण्यात येणारी जागा ही ट्रक टर्मिनलची जागा होती. हजारो ट्रक वाहनांची ये-जा मार्केट परिसरात असते. त्यातील काही वाहने येथे पार्क केली जात होती. मात्र, वाहने बाहेर पार्क होऊ लागल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहतुकीस अडचणी निर्माण होतील. ती जागा ट्रक टर्मिनलसाठी असून येथे पार्क होणाऱ्या वाहनांना पर्यायी जागा नसल्याने आम्ही त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली असल्याचे बाजार समिती सभापती अशोक डक यांनी सांगितले.

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये हजारो जीव धोक्यात

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईतील मसाला मार्केटमधील बहुउद्देशीय मध्यवर्ती इमारतीत हजारो लोक धोक्याच्या छायेत वावरत आहेत. सध्या पावसाळा सुरु असल्यानं अनेक ठिकाणी इमारत दुर्घटना घडत आहेत. त्याची पुनरावृत्ती या ठिकाणीही होण्याचा धोका आहे. असं असताना बाजार समिती प्रशासन मात्र कोणतीही उपाययोजना करत नसल्यानं मोठे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवी मुंबई महापालिकेने ही इमारत वर्षांपूर्वी अतिधोकादायक जाहीर केलीय. या ठिकाणी असलेल्या 272 आस्थापना कार्यालयांना इमारत खाली करण्याची नोटीसही दिली होती. मात्र, असं असतानाही या इमारतीत बाजार समिती कार्यालयासह अनेक आस्थापना कार्यरत आहेत. शिवाय लवकरात लवकर इमारतीतील लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून इमारत खाली करण्याऐवजी या अतिधोकादायक इमारतीच्या टेरेसवर आणखी भार टाकण्याचे काम करण्यात आलंय.

एपीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडून मागीलवर्षी सुद्धा 12 लाख रुपये खर्च करून या इमारतीत लाकडी बांबू बांधून ताडपत्री टाकण्यात आली होती. यावर्षी सुद्धा जवळपास तेवढाच खर्च करून कितीतरी टन वजनाची लाकडे इमारतीच्या उरावर आणून ठेवली आहेत. ही इमारत कधीही कोसळू शकते हे माहिती असताना या इमारतीच्या गच्चीवर छेडछाड करून हा उपद्व्याप करण्याची आवश्यकता काय? असा सवाल येथील आस्थापनाधारक विचारत आहेत.

हेही वाचा :

केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक

नवी मुंबई विमानतळाच्या विकासकाचा मालकी हक्क GVK कडून ‘या’ कंपनीकडे, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये हजारो जीव धोक्यात, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष

(Traffic Jam at Navi Mumbai APMC Market)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.